Central Railway Block : मध्य रेल्वेचा तातडीचा ब्लॉक, 12 दिवस खोळंबा, गाड्यांच्या वेळा बदलल्या, पाहा सविस्तर

Last Updated:

Central Railway Night Block : निलजे–दातिवलीदरम्यान उड्डाणपूल हटवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलणार असून काही गाड्यांना अतिरिक्त थांबे देण्यात येणार आहेत.

News18
News18
मुंबई : प्रवाशांनो लक्ष द्या ही बातमी तुमच्यासाठी आहे कारण डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशनच्या महत्त्वाच्या प्रकल्पाअंतर्गत शीळफाटा येथील उड्डाणपूल हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी मध्य रेल्वेने निलजे आणि दातिवलीदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर वाहतूक ब्लॉक जाहीर केला आहे. नेमका हा ब्लॉक किती काळासाठी असणार आहे ते जाणून घेऊयात.
कशावर होणार परिणाम?
हा ब्लॉक 25 नोव्हेंबर,30 नोव्हेंबर तसेच 2 आणि 7 डिसेंबर रोजी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 या वेळेत राहणार आहे. या चारही दिवशी नियोजित ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून काही गाड्यांचे थांबे वाढवणे, काहींचे मार्ग वळवणे आवश्यक ठरणार आहे. निलजे–दातिवलीदरम्यान होणाऱ्या या कामामुळे मंगळूरू–सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस या गाडीला कळंबोली येथे सुमारे 50 मिनिटे थांबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
advertisement
एवढेच नाही तर 30 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर रोजी दौंड–ग्वाल्हेर अतिजलद एक्स्प्रेस गाडीचा मार्ग बदलण्यात येणार आहे. ही गाडी नेहमीच्या मार्गाऐवजी कर्जत–कल्याण–वसई रोड मार्गे वळवण्यात येईल. बदललेल्या मार्गामुळे प्रवाशांना अडचण होऊ नये म्हणून या गाडीला कल्याण स्टेशनवर विशेष थांबा देण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, उड्डाणपूल हटवण्याचे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या पुढील टप्प्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मालवाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी आणि फ्रेट कॉरिडॉरची गतीमानता सुधारण्यासाठी हा पूल हटवणे आवश्यक असल्याने ब्लॉक घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवाशांनी या कालावधीत प्रवासाची नियोजनपूर्व तयारी ठेवावी .
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Central Railway Block : मध्य रेल्वेचा तातडीचा ब्लॉक, 12 दिवस खोळंबा, गाड्यांच्या वेळा बदलल्या, पाहा सविस्तर
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement