Shocking News : दिवसाढवळ्या बस स्टॉपवर घडलं भयकंर; विवाहित महिलेला धक्काबुक्की करुन...; पनेवलमधील घटना

Last Updated:

Panvel Crime : पनवेल येथील एका बस स्टॉपवर विवाहित महिलेला दोन अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलीवरून धक्का मारून 1.20 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरी केले.

News18
News18
पनवेल : पनवेल तालुक्यातील डेरवली बस स्टॉप जवळील रस्त्यावर एका विवाहित महिलेस धक्काबुक्की करून मंगळसूत्राची चोरी करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती पाटील या महिलेला बस स्टॉपवर वाट पाहत असताना अचानक काळ्या रंगाच्या मोटारसायकलीवरून दोन अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी स्वातीवर जोरदार धक्का मारून तिला जखमी केले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून मोटारसायकलीवरून पसार झाले.
विवाहित महिलेसोबत घडलं भयंकर
मंगळसूत्राची अंदाजित किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. घटनास्थळी उपस्थित राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली. पनवेल पोलीस घटनास्थळी पोहोचले असून सायकलीवरून गेलेल्या या संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे आणि अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यास सुचविले आहे.
advertisement
पोलिसांनी बस स्टॉप परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली असून संशयितांचा मागोवा घेण्यासाठी आसपासच्या रस्त्यांवर चौकशी सुरू आहे. स्वाती पाटीलच्या जवळच्या नातेवाइकांनी तिला मानसिक आधार दिला असून लोकांनाही अशा प्रसंगात तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पनवेल भागातील नागरिकांनी आपले मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले असून सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे सांगितले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking News : दिवसाढवळ्या बस स्टॉपवर घडलं भयकंर; विवाहित महिलेला धक्काबुक्की करुन...; पनेवलमधील घटना
Next Article
advertisement
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं? टेन्शन नाही वापरा ही ट्रिक
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं?
  • गोल्ड ETF द्वारे १००० रुपयांपासून सोन्यात डिजिटल गुंतवणूक करता येते, मेकिंग चार्ज लागत नाही

  • गोल्ड ETF मध्ये ९९.५% शुद्धतेची खात्री, चोरीची भीती नाही आणि त्वरित विक्री सहज शक्य आहे

  • डीमॅट अकाउंटद्वारे सोन्याचे युनिट्स खरेदी-विक्री करता येतात, गरज पडल्यास कर्जही मिळू शकते

View All
advertisement