Mhada House : म्हाडा विजेत्यांसाठी मोठा झटका, 70 जणांचा घराचा ताबा काढला जाईल; कारण...
Last Updated:
Mumbai MHADA : म्हाडा मास्टर लिस्टवरील 70 विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द करण्याची तयारी करत आहे. एकतर्फी कारवाईच्या माध्यमातून या निर्णयामागील कारणे आणि यामुळे घरमालकांवर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती मिळवा.
मुंबई : सर्वसामान्यांचे मुंबई शहरात हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यात म्हाडा कायमच मदत करते. मात्र आता म्हाडाच्या घराची स्वप्ने पाहणाऱ्या लोकांसाठी मोठा धक्का बसणारी बातमी समोर येत आहे. जी की म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील 70 विजेत्यांच्या घराचा हक्क रद्द केला जाणार आहे. दीड वर्षांनंतरही घराचा ताबा न घेतल्यामुळे ही एकतर्फी कारवाई सुरू झाली असून प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर कार्यवाही होईल.
म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील विजेत्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने डिसेंबर 2023 मध्ये 265 घरांसाठी ऑनलाईन लॉटरी काढली होती. या लॉटरीतून निवडलेल्या घरांमध्ये मिळालेल्या संधीवर अनेकांनी विश्वास ठेवला. मात्र, काही जणांनी दीड वर्षानंतरही आपले घर स्वीकारलेले नाही.
तसेच 172 जणांना नोटीस पाठवली गेली.पण केवळ 93 जणांनी घराचा ताबा घेतला. उर्वरित जवळपास 70 जणांनी घर स्वीकारण्यास मागे हटल्यामुळे म्हाडाने त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. तरीही दीड महिना उलटला तरी संबंधित विजेत्यांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. यामुळे म्हाडाने एकतर्फी कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे.
advertisement
म्हाडाच्या नियमांनुसार त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीची जागा कमी असल्यास किंवा पालिकेच्या आरक्षणामुळे भूखंड बाधित झाला असेल, तर त्यावर नव्याने इमारत उभारता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये त्या इमारतीमधील रहिवाशांचा समावेश म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये करून त्यांना इतर पुनर्निर्मित इमारतीतील अतिरिक्त अपार्टमेंट्स मालकीवर दिल्या जातात.
संबंधित विजेत्यांनी स्वीकृती पत्र पाठवून 45 दिवसांत घर स्वीकारणे बंधनकारक असून त्यानुसार म्हाडाने त्यांना दिलेली संधी स्वीकारावी अशी अपेक्षा होती. मात्र, 70 जणांनी दीड वर्षानंतरही घराचा ताबा घेतलेला नाही, जे आता गंभीर समस्येचे कारण बनले आहे.
advertisement
यामुळे म्हाडाने प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यावर संबंधित विजेत्यांवर घराचा हक्क रद्द करण्याची एकतर्फी कारवाई करण्याची तयारी केली आहे. या कारवाईमुळे निवडलेल्या घरांचे भविष्य धोक्यात येऊ शकते तसेच विजेत्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक झटका बसण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की नियमांच पालन करणे अनिवार्य आहे, अन्यथा घर स्वीकारण्याच्या संधीवर पुन्हा नजर ठेवली जाणार नाही. त्यामुळे या निर्णयामुळे विजेत्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण होण्याची भीती आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 11:40 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mhada House : म्हाडा विजेत्यांसाठी मोठा झटका, 70 जणांचा घराचा ताबा काढला जाईल; कारण...