MLC Election Update: या तीन जागा निवडून आणण्यासाठी महायुतीने अशी केली खेळी

Last Updated:

महायुतीने यावेळी उमेदवारी देताना जातीय समीकरणं देखील अगदी सुरळीतपणे बांधल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर उमेदवारी देताना प्रादेशिक समतोल देखील साधल्याचं दिसत आहेत. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत विधानसभेची सेमीफायनल महायुतीने जिंकली आहे.

News18
News18
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. महायुतीचे निवडणुकीच्या रिंगणात असणारे सर्वच्या सर्व 9  उमेदवार विजयी ठरले आहेत. फक्त हे उमेदवार विजयी ठरले एवढंच महायुतीचं यश नाही. तर त्यापलीकडे या निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाला आहे. महायुतीने यावेळी उमेदवारी देताना जातीय समीकरणं देखील अगदी सुरळीतपणे बांधल्याचं पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर उमेदवारी देताना प्रादेशिक समतोल देखील साधल्याचं दिसत आहेत. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत विधानसभेची सेमीफायनल महायुतीने जिंकली आहे.
जातीय समीकरणांची मोट बांधली: यामध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे आणि राजेश विटेकर यांचा विजय महायुतीसाठी महत्वाचा आहे. कारण, यामध्ये जातीय समीकरणांची मोट बांधण्यात महायुतीला चांगलं यश मिळालं आहे. खरंतर पंकजा मुंडेंच्या पाठिशी राज्यातील वंजारी समाजाचा मोठा पाठिंबा सातत्याने पाहायला मिळाला आहे. वंजारी समाजाचे मराठवाड्यातील बीड, जालना आणि इतर काही जिल्ह्यांत प्राबल्य आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुतीला याचा नक्कीच फायदा होणार आहे. दुसरीकडे दलित समाजातील चेहर राजेश विटेकरांचा, अमित गोरखे यांचा विजय अत्यंत महत्वाचा आहे.
advertisement
मविआचं काय चुकलं? दरम्यान या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती. खरंतर काँग्रेसकडे मतांचा कोटा स्वबळावर पूर्ण करण्याची क्षमता होती. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता. असं  असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडे पुरेस संख्याबळ नव्हतं, तरी काँग्रेसची काही मतं मिळाल्याने अखेरीस मिलिंद नार्वेकर विजयी ठरले. पुढे जात प्रज्ञा सातव यांचा अगदी अपेक्षित असा विजय झाला. तर शेकापच्या जयंत पाटलांना मात्र पराभवाची धुळ चाखावी लागली, यामध्ये काँग्रेसची साधारण 8 मते फुटल्याने हे नुकसान झाल्याचं बोललं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
MLC Election Update: या तीन जागा निवडून आणण्यासाठी महायुतीने अशी केली खेळी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement