advertisement

Chemur Accident: विचित्र अपघातानं हादरलं चेंबूर, आठव्या मजल्यावरून कोसळले 6 कामगार, एक ठार

Last Updated:

Chembur Accident: इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच एक भयंकर अपघात झाला. इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून 6 कामगार थेट खाली पडले

Chembur News: विचित्र अपघातानं हादरलं चेंबूर, आठव्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू
Chembur News: विचित्र अपघातानं हादरलं चेंबूर, आठव्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू
संकेत वर्तक, प्रतिनिधी
मुंबई: दक्षिण मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच एक भीषण दुर्घटना घडली. निर्माणाधीन इमारतीच्या 8 व्या मजल्यावरून 6 कामगार थेट खाली कोसळले. यामध्ये एका कामगाराचं निधन झालं असून इतरांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
चेंबूर येथील सुभाषनगर परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे या कामगारांनी काम सुरू केलं होतं. आठव्या मजल्यावर विटांचं काम सुरू होतं. तेव्हा अचानक तोल गेल्याने सहा कामगार खाली कोसळले. 80 ते 90 फुटांवरून कोसळल्यानंतर त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तोपर्यंत एकाचं निधन झाल्याचं वृत्त आहे.
advertisement
सुरक्षेकडे दुर्लक्ष भोवलं
धक्कादायक बाब म्हणजे यावेळी कामगारांनी 'सेफ्टी किट' वापरलेलं नव्हतं. बांधकाम नियमांनुसार कामगारांनी सुरक्षेचे नियम पाळणं गरजेचं असतं. परंतु, या सुरक्षा नियमांकडे केलेलं दुर्लक्षच जीवाशी आलं असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर कामगार देखील गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.
advertisement
या अपघातानंतर सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एकाचा मृत्यू झाला असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Chemur Accident: विचित्र अपघातानं हादरलं चेंबूर, आठव्या मजल्यावरून कोसळले 6 कामगार, एक ठार
Next Article
advertisement
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार; मालकाचे खळबळजनक विधान, म्हणाला- हळूहळू काढण्यापेक्षा मी एकदाच...
4,000 कर्मचाऱ्यांची एका झटक्यात हकालपट्टी, 'क्रूर' पॅटर्न आता जगभर लागू होणार
  • सर्वात भयानक काळ सुरू

  • 'क्रूर' निर्णयाने कर्मचारी सुन्न

  • 4,000 कुटुंबांची चूल विझली

View All
advertisement