Mumbai Crime : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने संपवलं आयुष्य, 10 महिन्यापूर्वी लग्न; कुटूंबियांचा गंभीर आरोप!

Last Updated:

Pankaja Munde PA Anant Garje Wife : यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

 Pankaja Munde PA Anant Garje Wife dr gauri Finished her self
Pankaja Munde PA Anant Garje Wife dr gauri Finished her self
Pankaja Munde PA Anant Garje (सुश्मिता भदाणे, प्रतिनिधी) : मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. लग्नाला अवघे काही महिने झाले असतानाच हा प्रकार घडल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे, ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

10 महिन्यांपूर्वी लग्न

अनंत गर्जे आणि डॉ गौरी यांचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. नवीन संसाराची स्वप्ने पाहत असतानाच हा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 7 फेब्रुवारी रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. मात्र, वरळीमध्ये डॉ गौरी गर्जे यांनी स्वत:ला संपवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement

पतीचे बाहेर प्रेमसंबंध? कुटुंबीयांचा आरोप

मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा पती हा एका नामांकित राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे. पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते. या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
advertisement

आत्महत्या नाही तर हत्या...

मात्र, या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने संपवलं आयुष्य, 10 महिन्यापूर्वी लग्न; कुटूंबियांचा गंभीर आरोप!
Next Article
advertisement
Shiv Sena VS BJP: शिंदे गट सोडून भाजपात प्रवेश, माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण, उल्हानगरमधलं वातावरण तापलं
शिंदे गट सोडून भाजपात प्रवेश, माजी नगरसेविकेच्या पतीला मारहाण, उल्हानगरमधलं वाता
  • शिंदेंची साथ सोडून भाजपात प्रवेश केलेल्या स्थानिक नेत्याला मारहाण झाली आहे.

  • शिंदेंची साथ सोडून भाजपात प्रवेश केलेल्या स्थानिक नेत्याला मारहाण झाली आहे.

  • शिंदेंची साथ सोडून भाजपात प्रवेश केलेल्या स्थानिक नेत्याला मारहाण झाली आहे.

View All
advertisement