Mumbai Fire News : ऐन दिवाळीत मुंबईत अग्नितांडव, होरपळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, 3 जखमी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Mumbai Fire : ऐन दिवाळीतच आग लागल्याने जीवितहानी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगरमध्ये पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीने हाहाकार माजवला. या दुर्घटनेत 15 वर्षीय मुलाचा करुण अंत झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. ऐन दिवाळीतच आग लागल्याने जीवितहानी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
कॅप्टन प्रकाश पेठे मार्गवरील मच्छिमार नगरमधील चाळीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे साधारण ४ वाजता अचानक आग लागली. धूर व ज्वाळा पसरताच परिसरात गोंधळ उडाला.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि बेस्ट कर्मचारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जवळपास तासाभरात आग नियंत्रणात आणली. चाळीतून आग लागलेल्या ठिकाणाहून चार जणांना बाहेर काढून तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
advertisement
रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी यश खोत (वय 15) या मुलाला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. तर, देवेंद्र चौधरी (वय 30) यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, विराज खोत (वय 13) आणि संग्राम कुर्णे (वय 25) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
आगीचं कारण काय?
आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. विजेचा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण काय, याबाबत तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 12:38 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Fire News : ऐन दिवाळीत मुंबईत अग्नितांडव, होरपळून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, 3 जखमी