मुंबईतील 156 वर्ष जुन्या महाविद्यालयाला मिळाल्या पहिल्या महिला प्राचार्य

Last Updated:

Education: मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक घटना घडलीये. तब्बल 156 वर्षानंतर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये महिला प्राचार्याची नियुक्ती करण्यात आली.

मुंबईतील 158 वर्ष जुन्या महाविद्यालयाला मिळाल्या पहिल्या महिला प्राचार्य
मुंबईतील 158 वर्ष जुन्या महाविद्यालयाला मिळाल्या पहिल्या महिला प्राचार्य
मुंबई : एकविसाव्या शतकात आपण आजही पाहतो की, स्त्रिया पुरुषांच्या समकक्ष समाजातील विविध क्षेत्रांत काम करत आहेत. अनेक वर्षांपासून हा बदल दिसत आहे आणि स्त्रिया विविध क्षेत्रांत आपली कामगिरी सिद्ध करत आहेत. शिक्षण क्षेत्र या बदलासाठी विशेष महत्त्वाचे ठरले आहे. अशाच एका ऐतिहासिक क्षणी मुंबईतील प्रसिद्ध महाविद्यालयांपैकी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये पहिली महिला प्राचार्य नियुक्त झाली आहे. करुणा गोकर्ण असं त्यांचं नाव आहे.
करुणा गोकर्ण या गेल्या तीन दशकांपासून कॉलेजमध्ये बायोलॉजी शिकवत आणि विविध शैक्षणिक व प्रशासनिक पदे सांभाळत आहेत. महाविद्यालयाच्या 156 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिला प्राचार्य नियुक्त झाली आहे. 55 वर्षांच्या करुणा गोकर्ण यांना मे 2025 मध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्त केले होते. आता बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने त्यांची स्थायी प्राचार्यपदी नियुक्ती अधिकृत केली आहे, आणि ही नियुक्ती राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
advertisement
करुणा गोकर्ण यांनी सांगितले की, कॉलेजमध्ये काही मुख्य आव्हाने आहेत. त्यात प्रमुख म्हणजे शासकीय पातळीवर मंजूर केलेल्या शिक्षक पदांची कमतरता, तसेच फॅकल्टीमध्ये सतत बदल होणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्थिर शिक्षण मिळणे कठीण होते. त्यांच्या पुढील योजना म्हणजे सेंट झेवियर्सला विद्यापीठाचे दर्जा मिळवून देणे, ज्यामुळे कॉलेजमध्ये शैक्षणिक व संशोधन कार्याला मोठे प्रोत्साहन मिळेल. तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम आणि संशोधनाच्या संधी वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
गेल्या तीन दशके करुणा गोकर्ण यांनी कॉलेजच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जैवशास्त्राविषयी रुची निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचा अनुभव आणि ज्ञान आता कॉलेजच्या नेतृत्वात दिसून येईल, ज्यामुळे महिला नेतृत्वाचा नवीन अध्याय सेंट झेवियर्सच्या इतिहासात सुरू झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील 156 वर्ष जुन्या महाविद्यालयाला मिळाल्या पहिल्या महिला प्राचार्य
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement