Mumbai Local Train: मुसळधार पावसात मध्य रेल्वे खोळंबली; लोक ट्रॅकवरून चालत घराकडे
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे....
मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. काही ट्रेन्स उशीरा आहेत. तर काही ट्रेन्स पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही जणांनी तर चालत आपल्या घराची वाट जवळ केली.
ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांच्या दिशेनं जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला यावेळी सामोरं जावं लागलं. गाड्यां धीम्या गतीने चालणार असून, बहुतांश गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. इतकच नव्हे अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम पाहायला मिळतोय. गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुसळधार कोसळायला सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.
advertisement
मुंबईतील मुसळधार पावसामुळे सायन, किंग्ज सर्कल, दादर टीटी, हिंदमाता या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अंधेरी, मालाड या ठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे . सध्या पाण्याचे निचरा करण्याचे काम मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2024 11:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local Train: मुसळधार पावसात मध्य रेल्वे खोळंबली; लोक ट्रॅकवरून चालत घराकडे


