Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, CSMTवरून 15 तास एकही लोकल धावणार नाही, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून 15 तास लोकल सेवा ठप्प राहणार आहे. सीएसएमटी स्थानकात ब्लॉक घेण्यात येणार असून 59 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस येथे 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी-शनिवारी 5 तास आणि रविवारी रात्री 10 तास रेल्वे वाहतूक ठप्प राहणार आहे. 24 डब्यांच्या रेल्वे गाड्यांसाठी फलाट क्रमांक 12 आणि 13 च्या विस्तारीकरणासाठी प्री नॉन इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यासाठी 2 दिवसीय ब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. या काळात तब्बल 59 लोकल ठप्प राहणार असून 3 मेल एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तर 131 रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे.
सीएसएमटी येथे फलाट क्रमांक 12 आणि 13 यांची लांबी 24 डब्यांच्या गाड्या चालवण्यासाठी वाढवण्यात येत आहे. या फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता प्री नॉन-इंटरलॉकिंगचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन दिवसांत 15 तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आलीये. यासाठी 2 ब्लॉक घेण्यात येणार आहेत. पहिला ब्लॉक शुक्रवारी रात्री 11.30 ते शनिवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत सीएसएमटी ते भायखळा अप आणि डाऊन जलद मार्गावर घेण्यात येईल. तर दुसरा 10 तासांचा ब्लॉक शनिवारी रात्री 11.15 ते रविवारी सकाळी 9.15 वाजेपर्यंत असणार आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा अप-डाऊन जलद आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात उपनगरीय लोकलसेवा बंद राहणार आहे. तर मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा, परळ, दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यंत चालवण्यात येईल.
advertisement
शेवटची लोकल
शनिवारी सीएसएमटी स्थानकावरून शेवटची धीमी लोकल सीएसएमटी – ठाणे धीमी लोकल ही रात्री 10.46 वाजता सुटणार आहे. तर शेवटची जलद लोकल रात्री 10.41 वाजता सीएसएमटी – बदलापूर असणार आहे. हार्बर मार्गावरील शेवटची लोकल रात्री 10.34 वाजता सीएसएमटीहून पनवेलसाठी सुटेल, तर रात्री 11.24 वाजता सीएसएमटी – गोरेगाव लोकल धावणार आहे.
advertisement
या मेल एक्स्प्रेस रद्द
सीएसएमटीवर घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे तीन मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये शनिवार-रविवारी ट्रेन क्रमांक 11008/07 पुणे सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 12128/27 पुणे सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक 17618/17 नांदेड – सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस या गाड्या रद्द राहतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 28, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, CSMTवरून 15 तास एकही लोकल धावणार नाही, कारण काय?