Mumbai Local: दिवाळीच्या खरेदीला मुंबईत जाताय? परतण्याचा होईल खोळंबा, आज दुपारी या मार्गावरील लोकल रद्द!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Mumbai Local: मुंबईकरासांठी महत्त्वाची बातमी असून दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्याआधीच रेल्वेचं वेळात्रक पाहावं लागेल. कर्जत-खोपोली मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्जत स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी, 10 ऑक्टोबर रोजी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी कर्जत- खोपोलीदरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसेल. यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
या लोकल सेवा रद्द
डाऊन मार्गावर दुपारी 12 वाजता दुपारी 1.15 आणि दुपारी 3.39 वाजता सुटणाऱ्या कर्जत ते खोपोली लोकल रद्द राहतील.
अप मार्गावर सकाळी 11.20, दुपारी 12.40 आणि दुपारी 2.55 वाजता सुटणाच्या खोपोली ते कर्जत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
advertisement
अंशत: रद्द असणाऱ्या सेवा
दुपारी 12.20 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. लोकल सेवा कर्जत ते खोपोलीदरम्यान उपलब्ध नसेल.
दुपारी 1.48 वाजता सुटणारी खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत येथून नियोजित वेळेत चालवण्यात येईल. ही लोकल सेवा खोपोली ते कर्जत दरम्यान उपलब्ध नसेल.
advertisement
दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करावे. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 9:08 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: दिवाळीच्या खरेदीला मुंबईत जाताय? परतण्याचा होईल खोळंबा, आज दुपारी या मार्गावरील लोकल रद्द!