advertisement

Mumbai Water: मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या, जलाशय दुरुस्तीसाठी किती महिन्यांचा कालावधी लागणार?

Last Updated:

गेल्या अनेक वर्षांपासून मालाडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मालाडकरांना पुढचे काही दिवस पाण्यासंबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार आहेत.

News18
News18
मुंबई: मालाडकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मालाडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे मालाडकरांना तब्बल दीड वर्षे पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे मालाडकरांना इतके दिवस पाणी पुरवठ्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावू नये, या दृष्टीने बीएमसीने परिसरात काही ठिकाणी जलाशय उभारले होते. त्याच जलाशयांची आता दुरावस्था झाल्यामुळे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
जलाशयाची दुरूस्ती
मालाडकरांना पाणीपुरवठा पुरवणाऱ्या 42 वर्षे जुन्या टेकडी जलाशयाची आता बिकट दुरावस्था झाली आहे. 18.14 दशलक्ष लिटर साठवणूक करणाऱ्या ह्या जलाशयाचे बांधकाम 1984 साली करण्यात आले होते. मालाडमधील टेकडीवर जलाशय- 2 बांधण्यात आले होते. इतके वर्षे लोटल्यानंतर मालाडकरांना पाणी पुरवठा पुरवणाऱ्या जलाशयची बीएमसीच्या तांत्रिक सल्लागाराच्या सूचनेनुसार जल अभियांत्रिकी विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर जलाशयाचे कामकाज करण्याचा त्यांनी सल्ला दिला. या कामकाजासाठी जवळपास दीड वर्षांचा म्हणजेच 18 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे
advertisement
जलाशयाच्या दुरूस्तीसाठी किती कालावधी लागणार?
जलाशय आणि नियंत्रण कक्षाच्या दुरूस्तीनंतर मालाड परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास बीएमसीने व्यक्त केला आहे. जलाशयाच्या दुरूस्तीला 18 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून या कामानंतर मालाडवासीयांची पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. सध्या उन्हाळा सुरू आहे. या दिवसामध्ये नागरिकांना पाण्याची समस्या अधिक असते. या दिवसांमध्ये घरगुती महिलांकडून पाण्याचा वापर सर्वाधिक केला जातो. जलाशयातील पाणी मोठ्या प्रमाणावर वाया सुद्धा जात असल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. ठिकठिकाणी होणारी पाण्याची गळती रोखून मालाडच्या जलाशयातील दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मालाडकरांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून पाणी टंचाईतून मुक्तता करण्यासाठी दुरूस्तीची कामे सुरू आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या, जलाशय दुरुस्तीसाठी किती महिन्यांचा कालावधी लागणार?
Next Article
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय  वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
Vaibhav Sooryavanshi : IPL आधीच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला वॉर्निंग, नेमकं काय घडलं?
View All
advertisement