वाघोलीत रक्ताचा सडा! चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यावर सपासप वार, कोयता डोक्यात अडकला; थरारक Video
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले आणि आरोपींनी आपल्यासोबत आणलेल्या कोयत्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
सुमीत सोनावणे, प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील वाघोली परिसरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायसोनी कॉलेजसमोरील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेल्या नागेश जगताप या विद्यार्थ्यावर मंगेश सांगळे आणि त्याच्या दोन साथीदारांनी जुन्या वादाचा राग मनात धरून हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, आरोपीने नागेशच्या डोक्यावर मारलेला कोयता डोक्यातच अडकला . या थरारक घटनेमुळे वाघोली आणि लोणीकंद परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, नागेश जगताप आणि त्याचा मित्र सिद्धेश हे दोघे रायसोनी कॉलेजसमोरील एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी तिथे आरोपी मंगेश सांगळे आपल्या दोन साथीदारांसह दाखल झाला. तू मला शिवी का दिली होतीस? असे म्हणत त्याने नागेशशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झाले आणि आरोपींनी आपल्यासोबत आणलेल्या कोयत्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
advertisement
थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
भररस्त्यात सुरू असलेल्या या हल्ल्यात आरोपींनी नागेशवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. नागेशच्या पाठीवर, अंगावर आणि शेवटी डोक्यात जोरात वार करण्यात आला. हा वार इतका जोरात होता की कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. नागेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतरही आरोपींची दहशत सुरूच होती. नागेशला वाचवण्यासाठी गेलेल्या सिद्धेशवरही आरोपींनी वार केले, ज्यात तोदेखील गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे फुटेज पाहून अंगावर शहारे येत आहेत.
advertisement
वाघोलीत 'कोयता गँग'ची पुनरावृत्ती?
या घटनेनंतर जखमी नागेशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. भरदिवसा कॉलेजच्या परिसरात अशा प्रकारे शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या आणि विद्यार्थ्यांवर हल्ले करणाऱ्या गुंडांमुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
advertisement
अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे
कोयता गँगकडे भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांच्या मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 5:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
वाघोलीत रक्ताचा सडा! चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यावर सपासप वार, कोयता डोक्यात अडकला; थरारक Video










