Mumbai Traffic: मुंबईकर लक्ष द्या! मेट्रो-4 कामासाठी वर्दळीचा रस्ता बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai Traffic: मुंबईतील मेट्रो लाईन 4 च्या कामासाठी भांडुप ते सोनापूर जंक्शनवर 2 दिवस वाहतूक बंद राहणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.
मुंबई: मुंबईत मेट्रो लाईन 4 च्या बांधकामासाठी भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या कामाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून 56 मीटर लांबीचा विशाल स्टील स्पॅन बसविण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुप, मुलुंड आणि कांजुरमार्ग परिसरातील नागरिकांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप-सोनापूर जंक्शनवरील वाहतूक 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपासून 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत, तसेच 2 नोव्हेंबरच्या रात्री 10 वाजेपासून 3 नोव्हेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहील. या काळात केवळ आपत्कालीन वाहने यांनाच मार्गावरून जाण्याची परवानगी दिली जाईल. जर काम ठरलेल्या वेळेत पूर्ण झाले नाही तर 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी पुन्हा हाच मार्ग बंद ठेवण्याची शक्यता आहे.
advertisement
याशिवाय मेट्रो-4 च्या पुढील कामासाठी एलबीएस रोडवरील एक लेन 3 नोव्हेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करणे गरजेचे आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था:
पवई आणि जेवीएलआर (JVLR) वरून एलबीएस रोडमार्गे मुलुंडकडे जाणाऱ्या वाहनांनी मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडशी जोडणाऱ्या मार्गाचा वापर करावा.
advertisement
मुलुंड (पश्चिम) येथून पूर्वेकडील भागात किंवा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) कडे जाणाऱ्या वाहनांनी जेवीएलआर मार्गे प्रवास करावा.
कांजुरमार्ग आणि भांडुप (पश्चिम) येथून एलबीएस रोडमार्गे मुलुंड (पूर्व) किंवा (पश्चिम) कडे जाणाऱ्या वाहनचालकांना भांडुप पोलिस स्टेशन, कल्पना चावला चौक आणि मधुबन गार्डन परिसरात वाहतूक मर्यादांचा सामना करावा लागेल.
दरम्यान, या कालावधीत शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रॅफिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. मेट्रो-4 चे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होईल असे पोलिसांनी नमूद केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:54 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Traffic: मुंबईकर लक्ष द्या! मेट्रो-4 कामासाठी वर्दळीचा रस्ता बंद राहणार, पाहा पर्यायी मार्ग


