advertisement

मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? 'पॉवर सेंटर्स'वर कब्जा मिळवण्यासाठी पक्षांची फिल्डिंग

Last Updated:

स्थायी समिती तसेच सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
सुमीत सावंत, प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला उद्या होणार असून, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उद्या स्थायी समिती तसेच सुधार, बेस्ट आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.
advertisement
मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीकडे सर्वच समित्यांमध्ये सदस्य संख्येचे स्पष्ट वर्चस्व असल्यामुळे, यंदाही प्रमुख समित्यांची अध्यक्षपदे भाजप आणि शिंदेसेनेच्याच ताब्यात राहणार आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीत फारसा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार नसल्याचे चित्र आहे. भाजप-शिंदेसेना युतीत स्थायी आणि शिक्षण समितीचे अध्यक्षपद भाजपकडे, तर बेस्ट समितीचे अध्यक्षपद शिंदेसेनेकडे देण्याचा प्राथमिक निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सुधार समितीच्या अध्यक्षपदाबाबत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. या समितीचे अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला येणार, यावर आज उशिरापर्यंत चर्चा सुरू राहण्याची शक्यता आहे.
advertisement

शिक्षण समिती

शिक्षण समितीमध्ये 26 सदस्य संख्या आहे यामध्ये 22 सदस्य निवडून आलेले तर 4  बिगर पालिका सदस्य आहेत .

भाजप

१. राजेश्री राजेश शिरवडकर
२. स्वप्ना विरेंद्र म्हात्रे
३. सुषम गोपाळ सावंत
४. शिवानंद (शिवा) शेट्टी
५. योगिता सुनिल कोळी
६. डॉ. नील किरीट सोमैया
७. रोहन शशिन्द्र राठोड
advertisement
८. पिल्ले श्रीकला रामचंद्रन
९. राजपूत विक्रम प्रतापसिंह
१०. निखिल किशोर व्यास - बिगर पालिका सदस्य
११. योजना ठोकळे - बिगर पालिका सदस्य

शिंदेसेना

१) अंजली संजय नाईक
२) वर्षा स्वप्निल टेंबलकर
३) धनश्री भरडकर
४) चंद्रावती मोरे - बिगर पालिका सदस्य
शिक्षण समितीत राजेश्री शिरवाडकर यांचं नाव सध्या चर्चेत आहेत . राजश्री यांचं नाव महापौर पदाच्या शर्यतीत होतं, मात्र त्यांना महापौर पदाने हुलकावणी दिल्यानंतर आता त्यांची शिक्षण समितीवर वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे . शिक्षण समितीचा अध्यक्ष हा पदसिद्ध स्थायी समितीचा सदस्य असतो, त्यामुळे राजेश्री नाईक यांना स्थायी समितीमध्ये देखील स्थान मिळू शकणार आहे .
advertisement

स्थायी समिती

स्थायी समितीमध्ये २६ सदस्य आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्याने या समितीत २७ सदस्य संख्या होते

भाजप

१. गणेश दत्ताराम खणकर
२. प्रभाकर शिंदे
३. राखी हरिश्चंद्र जाधव
४. अॅड. मकरंद सुरेश नार्वेकर
५. हरिष भांदिर्गे
६. शिवकुमार वासुकीनाथ झा
७. शितल सुरेश गंभीर
८. प्रकाश यशवंत दरेकर
advertisement
९. प्रिती मनोज सातम
१०. तिवाना ताजिंदरसिंग सतनामसिंग

शिंदे शिवसेना

१) अमेय घोले
२) यामिनी जाधव
३) नाईक संजय
४) सईदा खान
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्या स्थायी समिती अध्यक्षाच्या हातात असतात. त्यामुळे या पदावर जाण्यासाठी अनेक जन इच्छुक असतात. आता भाजप ही समिती आपल्याकडेच ठेवणार आल्याची माहिती आहे . भाजपकडून या अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश बंगिर्दे यांची नावे चर्चेत आहेत . प्रभाकर शिंदे हे मागच्यावेळी गट नेते होते आणि स्थायी समितीमध्येही सदस्य होते. स्थायी समितीचा आणि कामकाजाचा त्यांचा अभ्यास आहे . तर मकरंद नार्वेकर यांनीही स्थायी समितीमध्ये या आधी काम केलं आहे . त्यामुळे आता कोणाची वर्णी या पदावर लागणार याकडे लक्ष आहे .
advertisement

बेस्ट समिती

बेस्ट समितीमध्ये १६ सदस्य संख्या असते, मात्र हे सदस्य नगरसेवक असावेत अशी अट नाही . केवळ एक सदस्य किमान नगरसेवक असावी . तर स्थायी समिती अध्यक्ष हे बेस्ट समितीचा पदसिद्ध सदस्य असतात . त्यामुळे ही संख्या १७ होते. सध्या या समितीवर असलेल्या सदस्यांपैकी ४ सदस्य नगरसेवक आहेत. तर उर्वरित बाहेरचे सदस्य आहेत . बेस्ट समिती शिवसेनेला मिळणार असल्याने शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव यांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तृष्णा विश्वास राव या बेस्ट मध्ये सदस्य असून त्यांनाही दांडगा अनुभव आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार? 'पॉवर सेंटर्स'वर कब्जा मिळवण्यासाठी पक्षांची फिल्डिंग
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement