अविवाहित तरुणीचं बाळ, 5 लाखांत सौदा, मुंबईत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईच्या शिवाजीनगर-गोवंडीमध्ये नवजात बाळ विक्री रॅकेट उघडकीस आले, डॉ. कयामुद्दीन खानसह पाच जणांवर गुन्हा दाखल, बिनू वर्गीसने पोलिसांना माहिती दिली.
मुंबईतील शिवाजीनगर-गोवंडी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं नवजात बाळाची विक्री करणारं मोठं रॅकेट उघडकीस आलं आहे. नवजात बाळाचा ५ लाख रुपयांना सौदा केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बाळाच्या आईसह डॉक्टर, एजंट महिला अणि बाळ खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी येथील एका नर्सिंग होममध्ये एका २१ वर्षीय अविवाहित महिलेने बाळाला जन्म दिला होता. याच बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला आहे. या बाळाचा पाच लाखांमध्ये सौदा देखील ठरवला होता. मात्र बिनू वर्गीस नावाच्या एका सामाजिक कार्यकत्याने या बाळाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर देवनार पोलीस ठाण्यातील पथकाने तत्काळ नर्सिंग होम गाठले आणि तपास सुरू केला.
advertisement
यावेळी बाळाची खरोखर विक्री होत असल्याचं समोर आलं. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी नर्सिंग होमचा मालक डॉ. कयामुद्दीन खान, कर्मचारी अनिता पोपट सावंत, बाळाची आई तसेच एजंट शमा आणि बाळ खरेदी करण्याचा प्रयत्न करणारी दर्शना अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरात नर्सिंग होमचे आणखी कर्मचारी सामील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बाळाची डिलिव्हरी करणारा डॉक्टर प्रॅक्टिशनर असून त्याला अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नाही. या क्लिनिकमध्ये यापूर्वीही अनेक अवैध गर्भपात करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 9:10 AM IST


