Mumbai News : ससून डॉकमधील मच्छीमार संतप्त, थेट रस्त्यावर येत आंदोलनाचा इशारा, कारण काय?

Last Updated:

Sasoon Dock Protest : ससून डॉक येथील सील केलेली गोदामे तात्काळ खुली न केल्यास कोळी बांधवांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. अचानक गोदामे रिकामी केल्याने हजारो कुटुंबांचे उपजीविकेचे संकट वाढले असून सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

News18
News18
मुंबई : कुलाबातील ससून डॉकचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. कारण आता येथील सील करण्यात आलेली गोदामे आणि कार्यालये तात्काळ खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोळी बांधवांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांत प्रशासनाने अचानक पावले उचलत ससून डॉकमधील जवळपास 17 ते 18 गोदामे रिकामी करून सील केली. या निर्णयामुळे येथे काम करणारे मच्छीमार, व्यापारी, लिलावदार तसेच हातगाडी कामगार आणि अन्य व्यवसायांवर जगणारे कुटुंबीय अशा सुमारे 10 ते 12 हजार लोकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
ससून डॉक मासेमारी बंदर बचाव कृती समितीचे अध्यक्ष कृष्णा पवळे यांनी आरोप केला की राज्य सरकारने गेल्या 20 ते 25 वर्षांपासून कोळी बांधवांकडून भाडे घेऊन ते स्वतःच्या तिजोरीत जमा केले, परंतु या गोदामांबाबत कोणतीही स्पष्ट धोरणात्मक अंमलबजावणी केली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने त्रिपक्षीय करार करण्यात आला होता. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात झालेल्या अपयशाचा फटका सर्वात जास्त मच्छीमारांना बसत आहे. सरकारचा उद्देश कोळी समाजाला येथून हटवण्याचा आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
advertisement
ससून डॉक हे मुंबईतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचे मासेमारी बंदर आहे. येथून दररोज हजारो टन मच्छीची आवक-जावक होते. याठिकाणी कार्यरत असलेले फिश सप्लायर्स, आईस सप्लायर्स, लिलावदार आणि बोट मालक यांची संपूर्ण अर्थव्यवस्था या गोदामांवरच अवलंबून आहे. अचानक कारवाईमुळे सर्वांचे उत्पन्न बंद झाल्याने परिसरात प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे पवळे यांनी नमूद केले.
advertisement
या पत्रकार परिषदेला दिलीप कोळी, अमोल कोलाबकर, शिवाशेठ बोरकर, महेंद्र कांबळे, रूकसाना खान, इरफान खान, गोपीचंद पवार यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने इशारा दिला की, गोदामे तात्काळ खुली न केल्यास मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल. सरकारने तत्काळ हस्तक्षेप करून कोळी बांधवांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : ससून डॉकमधील मच्छीमार संतप्त, थेट रस्त्यावर येत आंदोलनाचा इशारा, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement