Railway : वंदे भारतपेक्षा सुपरफास्ट! 20 तासांचा प्रवास फक्त 4 तासांत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात; कोणती आहे ही ट्रेन?
- Published by:Priya Lad
Last Updated:
High Speed Train : ताशी 250 किमी वेगाने धावणारी ही ट्रेन लाँच करण्यात आली आहे. 2000 किमीच्या विशाल नेटवर्कवर चालणारी ही ट्रेन प्रवासाचा वेळ 50% कम करेल.
हाय-स्पीड रेल्वे आधुनिक काळाची गरज बनली आहे. ही जलद, सुरक्षित, पर्यावरणपूरक तसंच प्रवासी आणि उद्योग दोघांसाठीही फायदेशीर आहे. किमती कमी आहेत आणि वेळेची बचत जास्त आहे. भारतात वंदे भारत की सगळ्यात जास्त वेगवान ट्रेन आहे, तर आता इजिप्तने 250 किमी ताशी वेगाने धावणारी हाय-स्पीड वेलारो ट्रेन लाँच करून जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
इजिप्तचे हाय-स्पीड रेल्वे नेटवर्क एकूण 2000 किलोमीटरपर्यंत पसरेल, ज्यामध्ये देशातील सर्वात मोठ्या शहरांना जोडण्यासाठी आणि आर्थिक कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेल्या तीन प्रमुख मार्गांचा समावेश आहे. सीमेन्स, ओरासकॉम कन्स्ट्रक्शन आणि अरब कॉन्ट्रॅक्टर्स संयुक्तपणे संपूर्ण नेटवर्क विकसित करत आहेत.
advertisement
वेलारो गाड्या जर्मनीमध्ये डिझाइन आणि तयार केल्या जात आहेत. वेलारो गाड्या केवळ हाय-स्पीड नाहीत तर त्यांची क्षमता 489 प्रवाशांची आहे, आधुनिक डिझाइन आहे आणि कठोर वाळवंटातील हवामानाचा सामना करण्याची क्षमता आहे. इजिप्तचा दावा आहे की हाय-स्पीड नेटवर्क प्रवासाचा वेळ 50% कमी करेल आणि 90% लोकसंख्येला थेट फायदा देईल.
advertisement
आफ्रिकन वाळवंट परिस्थितीसाठी विशेषतः सुधारित केलेली ही पहिली ट्रेन आहे. इजिप्तच्या वाळवंटातील प्रदेशांमध्ये, तीव्र सूर्यप्रकाश, 45 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान, वाळू आणि धूळ यंत्रसामग्रीचं जलद नुकसान करू शकतात. या कारणास्तव या ट्रेनमध्ये उच्च दर्जाची शीतकरण प्रणाली, प्रगत एअर फिल्टर आणि वाळू-प्रतिरोधक वैशिष्ट्ये आहेत.
advertisement


