Sanjay Raut : तोंडावर मास्क, थकलेली पावले, चालताना त्रास! पण तरीही बाळासाहेबांसाठी संजय राऊत 'शिवतीर्था'वर
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut : गंभीर आजारामुळे मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले.
मुंबई: गंभीर आजारामुळे मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. तर, चालताना राऊत यांना त्रास होत असल्याचे दिसून आले.
advertisement
शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले आहेत. आज सकाळपासून शिवसैनिकांची गर्दी झाली होती. अशातच सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित होते. संजय राऊत हे आल्याचे समजताच शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या जिद्दीला सलाम केला. तर, राऊत यांनी देखील हात उंचावत त्यांचे अभिवादन स्वीकारले.
advertisement
तोंडावर मास्क, चालताना त्रास....
संजय राऊत हे सध्या गंभीर आजाराचा सामना करत आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी राऊत हे अनेक दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दाखल झाले. यावेळी त्यांनी तोंडावर मास्क घातला होता. मात्र, त्यांना चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले.
advertisement
बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन...
संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनी अभिवादन केले. ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! असे संजय राऊत यांनी म्हटले. मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले.
advertisement
ज्यांच्यामुळे मी घडलो
असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना!
असा पुरुष सिंह होणे नाही!
मराठी माणसाने एकजुटीने राहावे
आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!
साहेब,
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/j77ALrc7vv
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2025
advertisement
आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा फोटो ट्वीट केला आहे. यामध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे मातोश्रीवर आले असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी संजय राऊत देखील उपस्थित असल्याचे फोटोत दिसून आले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : तोंडावर मास्क, थकलेली पावले, चालताना त्रास! पण तरीही बाळासाहेबांसाठी संजय राऊत 'शिवतीर्था'वर


