KL Rahul : 'सतत मिटिंग, असं का केलं? तसं का केलं?', केएल राहुलने टराटरा फाडला संजीव गोयंकांचा बुरखा! सांगितलं LSG सोडण्याचं खरं कारण
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
KL Rahul Exposed LSG owner Sanjiv Goenka : कॅप्टन म्हणून अनेक मिटिंग केल्या जात होत्या. अनेक रिव्ह्यू द्यावे लागत होते. खूप काही गोष्टी ओनरशिप लेवलवर सांगाव्या लागत होत्या, असं केएल राहुल म्हणाला.
Kl Rahul Exposed Sanjiv Goenka : आयपीएलमधील खेळाडू म्हणून सर्वात त्रासदायक चित्र कोणतं असेल तर केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यातील आक्रमक संभाषण... सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा पराभव केल्यानंतर संजीव गोयंका यांना झापलं होतं. अशातच आता केएल राहुलने संजीव गोयंका यांच्यावर मोठा खुलासा केला आहे.
मिटिंग केल्या जात होत्या, सतत प्रश्न - केएल राहुल
मी लखनऊमधून बाहेर पडलो कारण मला खूप लोकांना उत्तर द्यावं लागत होतं. कॅप्टन म्हणून सतत प्रश्न विचारले जात होते. कॅप्टन म्हणून अनेक मिटिंग केल्या जात होत्या. अनेक रिव्ह्यू द्यावे लागत होते. खूप काही गोष्टी ओनरशिप लेवलवर सांगाव्या लागत होत्या. त्यामुळे तुमची खूप एनर्जी खर्च होते, असं केएल राहुल म्हणाला. मला 10 महिने इंटरनॅशनल क्रिकेट खेळल्यानंतर जेवढी एनर्जी खर्च करावी लागत नव्हती, तेवढी मला दोन महिन्याच्या आयपीएलमध्ये करावी लागली, असंही राहुल म्हणाला.
advertisement
advertisement
संघात हा बदल का केला? हे का केलं, ते का केलं?
खूप काही गोष्टी आहेत. कोचेस आणि कॅप्टन यांनी सतत प्रश्नांचा मारा करायचा. त्यामुळे तुम्ही सतत विचारणार की, संघात हा बदल का केला? विरोधी संघाने 200 केल्या मग आपण 120 च का रन्स केल्या? असे प्रश्न मला विचारले जात होते. त्यांच्या बॉलर्सला चांगली स्पिन बॉलिंग का जमली? असे प्रश्न मला कधीही इतक्या वर्षात विचारले नव्हते, असं म्हणत केएल राहुलने संजीव गोयंका यांच्यावर टीका केली.
advertisement
नॉन स्पोटर्स बॅकग्राऊंड
क्रिकेटमध्ये आणि कोणत्याही स्पोर्टसमध्ये तुम्ही उत्तर देऊ शकत नाही. तो एक खेळ असतो. खेळामध्ये विजय हा फिक्स नसतो. या गोष्टी मला सतत त्या लोकांना समजवाव्या लागत होत्या, जे नॉन स्पोटर्स बॅकग्राऊंडमधून येतात, असं म्हणत केएल राहुलने संजीव गोयंका यांचा बुरखा टराटरा फाडला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KL Rahul : 'सतत मिटिंग, असं का केलं? तसं का केलं?', केएल राहुलने टराटरा फाडला संजीव गोयंकांचा बुरखा! सांगितलं LSG सोडण्याचं खरं कारण


