Mumbai : खुशखबर! 47 वर्षांनंतर अखेर मुहूर्त सापडला; मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार
Last Updated:
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता या चाकरमान्यांना नवा मार्ग मिळणार आहे. नेमका हा मार्ग कोणता आहे कधी सुरु होणार आहे ते जाणून घ्या.
मुंबई : मुंबई शहरातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय कोकणात जाण्यासाठी मुंबईहून अनेर रेल्वे उपलब्ध आहेत. मात्र, हा प्रवास रस्ते मार्गानेही लवकर जोडण्यासाठी अनेक प्रकल्प सुरु केलेले आहेत. त्यातील एक रखडलेल्या महत्त्वाचा मार्ग होण्यासाठी काम सुरु करण्यात आलेले आहे.
नेमका कोणता मार्ग होणार सुरु?
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या रेवस-रेड्डी सागरी महामार्गातील रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई आणि कोकणाला थेट जोडणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पाचे सुमारे 22 ते 25 टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर 2026 पर्यंत 50 टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
advertisement
रखडलेला प्रकल्प आता वेगात
हा प्रकल्प एकूण 10.2 किलोमीटर लांबीचा आहे. त्यापैकी 2.4 किलोमीटरचा मुख्य पूल खाडीच्या मध्यभागी बांधला जात आहे. करंजा बाजूला 4 किलोमीटर आणि रेवस बाजूला 4 किलोमीटर असे जोडरस्ते तयार केले जात आहेत. सध्या समुद्रात 12 ते 13 खांब उभारण्यात आले असून मोठे दगड टाकून पाया मजबूत करण्याचे काम सुरू आहे.
advertisement
या मार्गाची घोषणा प्रथम 1980 साली करण्यात आली होती. अनेक वर्षे विविध कारणांमुळे प्रकल्प रखडला होता. आता काम वेगात सुरू असून मार्च 2028 पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान करंजा येथील चाणजे परिसरात जमीन संपादनावर काही स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी रस्ता गेल्यास पर्यावरण आणि ऐतिहासिक वारशाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. योग्य मोबदला देऊन मार्गाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
advertisement
पेण-पनवेलचा वळसा आता टळणार
हा पूल पूर्ण झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पोर्ट ते अलिबाग हे अंतर 55 किमीवरून सुमारे 30 किमीवर येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून पेण-पनवेलमार्गे जाण्याची गरज उरणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 21, 2026 1:45 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : खुशखबर! 47 वर्षांनंतर अखेर मुहूर्त सापडला; मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार









