मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!

Last Updated:

Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची गरज नाही. गर्दीच्या मार्गावरील केबल स्टेड ब्रिजच्या कामाची डेडलाईन ठरली आहे.

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!
Mumbai Traffic: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!
मुंबई: मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) शहराच्या मध्यवर्ती भागात दोन महत्त्वाचे पूल बांधत आहे. विविध अडथळ्यांना तोंड दिल्यानंतर बीएमसीने आता डॉ. ई. मोसेस रोड (वरळी नाका) ते सात रस्ता आणि सात रस्ता ते केशवराव खाडे मार्ग (हाजी अलीजवळ) हे दोन पूल 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले आहे. त्यामुळे मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलांचा उद्देश सात रस्ता जंक्शन आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरातील तीव्र वाहतूक कोंडी कमी करणे हा आहे. विशेष म्हणजे सात रस्ता ते महालक्ष्मी दरम्यान उभारण्यात येणारा 803 मीटर लांब व 17.2 मीटर रुंद पूल हा बीएमसीने रेल्वे ट्रॅकवर उभारलेला पहिलाच केबल-स्टेड पूल असणार आहे. रेल्वे हद्दीत या पुलाची रुंदी 23.01 मीटर आहे. दुसरा पूल डॉ. ई. मोसेस रोडपासून उत्तरेस वरळी आणि धोबी घाटाकडे जाणारा असून त्याची लांबी 639 मीटर आहे.
advertisement
2016 मध्ये आयआयटी मुंबईच्या अहवालानुसार 1920 मध्ये बांधलेल्या महालक्ष्मी आरओबी वरील भार कमी करण्याची गरज ओळखून या प्रकल्पाचे नियोजन सुरू झाले. मात्र अतिक्रमण, झाडांचे संवर्धन आणि रेल्वे परवानग्या यांसारख्या कारणांमुळे कामाचा वेग मंदावला होता. बुधवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी स्थळी भेट देऊन कामाचा आढावा घेतला.
advertisement
महापालिका आयुक्तांनी 78 मीटर उंच मुख्य खांब 200 दिवसांत पूर्ण करण्याचे, तसेच दोन्ही बाजूंनी एकाच वेळी काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पुलाच्या स्पॅनसाठी 250 दिवस लागणार असून पावसाळ्यादरम्यानही काम सतत सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे येत्या वर्षभरात हा पूल पूर्ण करण्याचे लक्ष्य असून त्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.
दरम्यान, पूल बांधकामामुळे प्रभावित होणारी घरे आणि आस्थापनांसाठी संबंधित वॉर्ड कार्यालय योग्य ती पावले उचलेल. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्लिप रोड्स वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. 745 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे वेळ व इंधन वाचणार असून मुंबईतील वाहतुकीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार, ‘या’ मार्गावरचा केबल-स्टेड ब्रिज खुला होणार, डेडलाईन ठरली!
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement