खळबळजनक! मुंबईतील महिलेनं मागवली आईस्क्रीम; खातानाच आत सापडलं माणसाचं बोट
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
Mumbai Ice Cream Finger News: या महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं कापलेलं बोट सापडलं. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे.
मुंबई : उन्हाळ्यात आपल्यापैकी अनेकांनी अगदी आवडीने आईस्क्रीमचा आस्वाद घेतला असेल. आईस्क्रीम खायला अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतं. मात्र, आता मुंबईतून (Mumbai News) एक अशी घटना समोर आली आहे. जी जाणून तुम्ही हादरून जाल. मुंबईतील मालाड भागात एका महिलेनं ऑनलाइन आईस्क्रीम ऑर्डर केली होती. मात्र, यानंतर जे काही घडलं त्याने महिलेला मोठा धक्का बसला
या महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये माणसाचं कापलेलं बोट (Mumbai Ice Cream Finger News) सापडलं. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांचं म्हणणं आहे की, आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळला आहे. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL (फॉरेन्सिक) कडे पाठवला आहे. मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करून हे आईस्क्रीम तपासासाठी पाठवले आहे.
advertisement
महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्लं होतं. मात्र नंतर काहीतरी गडबड असल्याचं लक्षात येताच तिने तपासणी केली असता त्या आईस्क्रीममध्ये मानवी बोटाचे तुकडे असल्याचं तिला दिसलं. हे पाहून महिलेला धक्का बसला. महिलेला सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा यात आढळला
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये अजब घटना
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज उद्योग नगरीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात अनैतिक संबंधाच्या कारणातून एका महिलेनंच दुसऱ्या महिलेला घराबाहेर असलेल्या गेटला दिवसभर बांधून ठेवलं. पतीचे या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नीने पतीच्या मैत्रिणीला दिवसभर गेटला बांधून चोप दिला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन महिलेची सुटका केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 13, 2024 10:27 AM IST