Mumbai Crime : मालकांनी मोबाईल दिला अन् गावाकडे निघाले, मागं कामगारासोबत भयंकर घडलं, 2 तासात सगळं संपलं
Last Updated:
Prabhadevi Crime News : प्रभादेवीमधील एका घडलेल्या गंभीर गुन्हाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून एक प्रश्न निर्माण झालेले आहे. नेमकी घटना कोणती ते जाणून घ्या.
मुंबई : प्रभादेवीतील कामगारनगर परिसरात 18 वर्षीय तरुणाचा घरात गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंशू वर्मा असे मृत तरुणाचे नाव असून तो गोखले रोडवरील एका चहाच्या टपरीवर काम करत होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अंथरुणावरच संपवलं आयुष्य
अंशू हा कामगारनगरमधील चाळीत आपल्या काही सहकाऱ्यांसोबत राहत होता. शनिवार,31 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास तो मद्यधुंद अवस्थेत कामगारनगरच्या गेटजवळ पडलेला होता. तेथील काही मुलांनी ही गोष्ट चहाटपरीचे मालक अक्षय पाटील यांना कळवली. त्यांच्या सांगण्यावरून मुलांनी अंशूला उठवून खोलीत झोपायला पाठवले. यावेळी अंशूचा मोबाइल पाटील यांच्याकडे देण्यात आला.
advertisement
मालकाने मोबाईल दिला अन् निघून गेले
मध्यरात्री सुमारे 12.10 वाजता पाटील अंशूच्या खोलीत गेले. अंशू झोपलेला दिसल्याने त्यांनी मोबाइल त्याच्या सहकाऱ्यांकडे दिला आणि रत्नागिरीकडे रवाना झाले. मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांतच अंशू बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दादर पोलिसांसमोर खुनाचं गूढ
रुग्णालयात पोहोचल्यानंतर अंशूच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवती लाल जखमा आढळल्या. यावरून त्याचा गळा आवळून आणि मारहाण करून खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खोलीत झोपताना कोणतीही जखम नव्हती असे पाटील यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्या दोन तासांत नेमके काय घडले याचा तपास पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 12:24 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : मालकांनी मोबाईल दिला अन् गावाकडे निघाले, मागं कामगारासोबत भयंकर घडलं, 2 तासात सगळं संपलं







