Navi Mumbai : विमानतळापर्यंतचा प्रवास आता थेट रेल्वेने! 'या' ठिकाणी उभे राहिले नवीन स्टेशन; काय आहे नाव?
Last Updated:
Gavhan Railway Station : नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे मार्गावर गव्हाण हे नवं रेल्वे स्टेशन सुरू झाल्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांसह विमानतळ प्रवाशांचा प्रवास आता अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तारघर या नव्या स्टेशननंतर आता नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर एक नवं रेल्वे स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. या स्थानकामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांसह विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि सुरक्षित होणार आहे.
कुठे आहे हे नवीन स्टेशन?
हे नवं स्टेशन नेरूळ-बेलापूर-उरण रेल्वे प्रकल्पाचा भाग असून या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 3,064 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या खर्चामध्ये CIDCO आणि मध्य रेल्वेचाही सहभाग आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील रेल्वे दळणवळण अधिक मजबूत झालं आहे.
नेमकं हे स्टेशन आहे तरी कोणतं?
नेरूळ, बेलापूर, उरण परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार हे स्टेशन म्हणजे गव्हाण रेल्वे स्टेशन आहे. विशेषतहा जळसई, चिरले आणि आजूबाजूच्या भागातील नागरिकांसाठी हे स्टेशन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
विमानतळ गाठणं आता सोपं
आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असल्यामुळे आता प्रवाशांना रेल्वेने थेट स्टेशनपर्यंत येऊन कमी वेळात विमानतळ गाठता येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास कमी होईल आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. गव्हाण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन रुंद प्लॅटफॉर्म, तिकीट खिडक्या, लिफ्ट, सरकते जिने आणि पादचारी पूल यांचा समावेश आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांनाही सहज प्रवास करता येणार आहे.
advertisement
पूर्वी नेरूळ-उरण मार्गावर प्रवास करताना गर्दी, रांगा आणि वेळेही जास्त प्रमाणात वाया जात होता. मात्र गव्हाण स्टेशन सुरू झाल्यानंतर या अडचणी कमी होऊन प्रवास अधिक आरामदायी आणि सुलभ होणार आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 8:32 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai : विमानतळापर्यंतचा प्रवास आता थेट रेल्वेने! 'या' ठिकाणी उभे राहिले नवीन स्टेशन; काय आहे नाव?









