Navi Mumbai Election: नवी मुंबईत शिंदेंचा 'पॉलिटिकल गेम' फसणार, प्रभागरचनेविरोधात भाजपच्या मंत्र्यांची थेट कोर्टात खेचण्याची भाषा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Navi Mumbai Election: एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून स्मार्ट खेळी खेळत भाजपच्या प्रभावी नगरसेवकांचे बालेकिल्ले तोडण्याचा प्रयत्न आरोप होत आहे.
विश्वनाथ सावंत , प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण मंत्री गणेश नाईक यांनी महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेविरोधात निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. आरोपांमध्ये तथ्य असताना दुर्लक्ष केल्यास थेट कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजवं आहे. एकनाथ शिंदेंनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून स्मार्ट खेळी खेळत भाजपच्या प्रभावी नगरसेवकांचे बालेकिल्ले तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रभाग रचनेवररून महायुतीतील वाद आणखी तीव्र होताना पाहायला मिळाला आहे. मंत्री गणेश नाईक यांनी कोर्टात जाण्याची भाषण केल्याने हा संघर्ष आता आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहे.
advertisement
काय म्हणाले?
गणेश नाईक म्हणाले, थेट रहिवाशी भाग असलेले विभाग तोडण्यात आले आहे. प्रभाग रचनेबाबत घेतलेल्या लोकांच्या आरोपांमध्ये तथ्य असतानाही निवडणूक आयोगाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास लोक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील.
भाजपच्या 24 माजी नगरसेवकांना प्रभाग रचनेचा थेट फटका
दरम्यान, भाजपाने या प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवले आहेत. शिवाय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या 24 माजी नगरसेवकांना प्रभाग रचनेचा थेट फटका बसला आहे. यामुळे भाजप मंत्री गणेश नाईक देखील आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने मंत्री नाईकांना यानिमित्ताने थेट आव्हानच दिलं आहे. शिंदेंनी थेट नाईकांना त्यांच्या होमग्राऊंडवर नवी मुंबईत घेरल्यानं भाजपनं देखील संताप सुरू केला आहे.
advertisement
कशी आहे नवी मुंबईची प्रभाग रचना?
महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी 111 सदस्यसंख्येच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला. चार सदस्यांचे 27 आणि तीन सदस्यांचा एक, अशा 28 प्रभागांचा हा आराखडा लगेचच वादाच्या भोवऱ्यात सापडला. भाजपच्या कार्यकर्त्यांसह नाईक यांच्या गटात या रचनेविरोधात तीव्र असंतोष दिसून आला. "या आखणीत ठाण्याचा प्रभाव आहे," असा थेट आरोप नाईक समर्थकांकडून करण्यात आला. गणेश नाईक यांची नवी मुंबईच्या राजकारणावर पकड आहे. आता त्यालाच धक्का लागण्याची शक्यता आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 17, 2025 6:25 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Election: नवी मुंबईत शिंदेंचा 'पॉलिटिकल गेम' फसणार, प्रभागरचनेविरोधात भाजपच्या मंत्र्यांची थेट कोर्टात खेचण्याची भाषा