देवाभाऊ नंतर फडणवीस 'काकाजी', मनोज जरांगेंकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाले...
- Published by:Prachi Amale
- Reported by:BALAJI NIRFAL
Last Updated:
Manoj Jarange: फडणवीसांनी आमचं भलं केलं आहे, त्यामुळे आम्ही वर्षावर आणि त्यांच्यावरही गुलाल उधळणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
धाराशिव: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली. मात्र, आझाद मैदानावरील आंदोलनानंतर मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य करण्यात आल्या. हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही हा एक प्रकारचा विजयच ठरला. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच तोडगा काढून आंदोलकांना शांत केलं. याच कारणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही फडणवीसांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा धाराशिव येथील कार्यक्रमात मनोज जरांगेनी कौतुक करत देवेंद्र फडणवीसांना काकाजी असे संबोधले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांना काकाजी असे संबोधले आहे. फडणवीस काकांनी सध्या मराठ्यांसोबत जुळवून घेतलंय जे समाजाचं चांगलं करत असतील आम्ही त्याच्यासोबत आहोत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल पडणार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
आम्ही वर्षावर गुलाल उधळणार : मनोज जरांगे
advertisement
मनोज जरांगे म्हणाले, फडणवीस काकांनी मराठ्यांसोबत जुळवून घेतले आहे. त्यांनी आता हैदराबाद गॅझेटचे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आमचं भलं केलं आम्ही त्यांचं कौतुक करू त्यांच्यासोबत राहणार आहे. आम्ही वर्षावर आणि त्यांच्यावरही गुलाल उधळणार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही गुलाल उधळणार आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सुटला की, आम्ही गुलाल उधळणार आहे. त्यांनी आमचा प्रश्न सोडवला मग आम्ही त्यांचं कौतुक करणारच आहे.
advertisement
आझाद मैदानावरील आंदोलनानंतर कौतुक
अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. तेव्हापासून जरांगे हे सातत्याने फडणवीसांवर टीका करत आहे. मात्र आझाद मैदानावरील आंदोलनानंतर जरांगे फडणवीसांचं कौतुक करताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवाभाऊ नंतर फडणवीस 'काकाजी', मनोज जरांगेंकडून पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचं कौतुक; म्हणाले...