नवी मुंबई महानगरपालिकेचा दणका, 79 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; नेमकं कारण काय?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निवडणूक कामकाज हे कालमर्यादित व अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यामध्ये टाळाटाळ, हयगय अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक ही 15 जानेवारी 2026 रोजी होत असून निवडणूक कामकाजासाठी विविध प्राधिकरणांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, नेमणूक पत्र देऊनही निवडणूक कामासाठी हजर न राहिलेल्या 79 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी एकूण 28 प्रभागांमध्ये 111 सदस्यसंख्येसाठी 1151 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, निवडणुकीच्या विविध टप्प्यांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर नियुक्त कर्मचाऱ्यांना नेमणूक पत्रे देण्यात आली होती. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले.
advertisement
टाळाटाळ, हयगय अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, पालिकेचा आदेश
सदर कर्मचाऱ्यांना नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत नेमणूक करण्यात आलेल्या ठिकाणी हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विहित वेळेत हजर न झाल्यास संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे. निवडणूक कामकाज हे कालमर्यादित व अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यामध्ये टाळाटाळ, हयगय अथवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
advertisement
नेमकी काय होणार कारवाई?
नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुव्यवस्थित व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी केली जात असून, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध राहावे यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
advertisement
प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, आचारसंहिता, मतदान व मतमोजणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी तसेच आपत्कालीन परिस्थितीत करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडणूक प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे कोणतीही त्रुटी, गोंधळ किंवा गैरप्रकार टाळून निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व पारदर्शक ठेवणे हा आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, अनुपस्थित राहणाऱ्या, आदेशांचे पालन न करणाऱ्या किंवा निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
advertisement
हे ही वाचा :
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:07 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबई महानगरपालिकेचा दणका, 79 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; नेमकं कारण काय?









