Vidhan Parishad Election: 'विधान परिषदेचं मतदान करताना आमच्यावर अन्याय,' राष्ट्रवादी आमदाराच्या विधानाने खळबळ
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
2 वर्षांपूर्वी मी स्वत: , छगन भुजबळ, नवाब मलिक तुरूंगात होतो, तर त्या वेळी आम्हाला मतदानाची मुभा का मिळाली नव्हती" असं सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपने सर्वाधिक पाच उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी एकउमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसने देखील एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
मतदान करताना आमच्यावर अन्याय -अनिल देशमुख दुपारपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एकूण 271 सदस्यांनी आपलं मतदान पूर्ण केलं आहे. आता या मतदानाच्या काळात भाजपाचे जेलवारीवरून आलेले आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला परवानगी मिळाली. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री अनिल देशमुखांनी आक्षेप घेतला आहे. "भाजपाने राजकीय दबावाचा वापर करत गणपत गायकवाडांना मतदान करम्याची मुभा दिली. 2 वर्षांपूर्वी मी स्वत: , छगन भुजबळ, नवाब मलिक तुरूंगात होतो, तर त्या वेळी आम्हाला मतदानाची मुभा का मिळाली नव्हती" असं सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे. टीका करताना या सर्व गोष्टी भाजपाच्या दबावाखाली घडत आहेत, असं देखील देशमुख म्हणाले.
advertisement
गणपत गायकवाडांना विरोध का? भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. या प्रकरणी ते सध्या तुरुंगात आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत न्यायालयाच्या आदेशानुसार ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांना विधानभवनात आणले आहे. गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराने मोठी खळबळ उढाली होती. यात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. जमीनीच्या वादातून ही घटना घडली होती. तेव्हा गणपत गायकवाड यांनी होय मीच गोळीबार केला असंही म्हटलं होतं.
advertisement
जागेचा जबरदस्तीने ताबा घेतल्याचा आरोप गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांनी केला होता. तसंच आपल्या मुलाला डोळ्यासमोर धक्काबुक्की केली, पोलिसांसमोरच मुलांना मारत असतील तर मी काय करणार? आत्मसंरक्षणासाठी हे केलं असंही तेव्हा गणपत गायकवाड म्हणाले होते.
त्यामुळे आता आमदार गणपत गायकवाडांना मतदान करण्याची संधी भाजपाने खरंच राजकीय दबावाचा वापर करत मिळवून दिली का? अशी चर्चा सध्या विरोधकांच्या गोटात सुरू आहे. काँग्रेसने यासंदर्भात आयोगाला पत्र देखील लिहिलं आहे, त्यामुळे यामध्ये पुढे नेमकं काय घडणारं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
view commentsLocation :
First Published :
July 12, 2024 3:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Vidhan Parishad Election: 'विधान परिषदेचं मतदान करताना आमच्यावर अन्याय,' राष्ट्रवादी आमदाराच्या विधानाने खळबळ


