Thane-CSMT Flyover : ठाणे-सीएसएमटी मार्गाबाबत मोठी अपडेट; लाखो प्रवाशांचा होणार सुसाट प्रवास; कसा अन् कुठे असेल नवा मार्ग?

Last Updated:

Thane To CSMT New Flyover Route : ठाणे ते सीएसएमटी प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी शीव उड्डाणपुलाच्या समांतर नवीन दोन पदरी पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

Thane To CSMT New Flyover Route
Thane To CSMT New Flyover Route
मुंबई : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरळीत करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या दुरुस्ती आणि नव्याने बांधकाम सुरू असलेल्या शीव उड्डाणपुलाच्या समांतर (सायन बाजूला) नवीन दोन पदरी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या तांत्रिक बाबी तसेच वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने उपयुक्तता पाहण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे-सीएसएमटी मार्गावर वेग वाढणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव उड्डाणपूल पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. सध्या येथे 2+1 अशी वाहन मार्गिका असून ठाणे आणि पूर्व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन मार्ग आणि सीएसएमटीकडे जाण्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे विशेषतहा गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
ही समस्या कायमची सोडवण्यासाठी समांतर उड्डाणपुलाचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. नवीन पूल सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग मिळणार असून विद्यमान पुलावरील ताण कमी होईल. परिणामी ठाणे ते सीएसएमटी प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि इंधन बचतीचा ठरेल असा दावा महापालिकेने केला आहे. वाहतूक पोलिसांनीही या पुलाच्या गरजेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
advertisement
या प्रस्तावित उड्डाणपुलाचा अंदाजे खर्च सुमारे 155 कोटी 2 लाख 37 हजार रुपये इतका आहे. यापूर्वी महालक्ष्मी परिसरातील काही उड्डाणपुलांच्या कामांवरून निर्माण झालेला वाद लक्षात घेता संभाव्य कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी हे काम त्याच कंत्राटदाराला देण्याचा विचार महापालिका करत आहे.
या दरम्यानच शीव उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचे काम वेगात सुरू असून साधारण मे 2026 पर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या रेल्वे हद्दीतील कामे, गर्डर बसवणे, पोहोच मार्ग आणि पादचारी भुयारी मार्गांचे काम प्रगतीपथावर आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Thane-CSMT Flyover : ठाणे-सीएसएमटी मार्गाबाबत मोठी अपडेट; लाखो प्रवाशांचा होणार सुसाट प्रवास; कसा अन् कुठे असेल नवा मार्ग?
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement