

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दादांचा अपघात नसून हा घातपात असल्याचा संशय येत असल्याचे सांगत युरोपियन तपास यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. अपघाताच्या चौकशीच्या अनुषंगाने दादांचे सहकारी बोलत नाहीत.त्यामुळे या अपघात चौकशीत कुणाचा खोडा आहे हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.









