Mumbai : स्वत:ला संपवण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने वडिलांना Whats App वर कसले पुरावे पाठवले? पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

Last Updated:

Pankaja Munde PA wife Ends Life : आपल्या पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता.

Pankaja Munde PA wife Ends Life
Pankaja Munde PA wife Ends Life
Mumbai Crime News : (विजय वंजारा, मुंबई प्रतिनिधी) : मुंबईतील वरळी येथे 10 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या 25 वर्षीय डॉक्टर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती तरुणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी होती. या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आहे. गौरी गर्जे असं या तरुणाचं नाव असून ती डॉक्टर होती.

पंकजा मुंडे यांचा स्वकीय सहाय्यक

मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणीचा पती हा एका नामांकित राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय मृत तरुणीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता. काही दिवसांपूर्वीच डॉक्टर तरुणीने आपल्या पतीविरूद्धचे पुरावे वडिलांना व्हॉट्स अॅपद्वारे पाठवले होते, अशी माहिती समोर आली आहे.
advertisement

पतीविरूद्धचे पुरावे वडिलांना व्हॉट्स अॅप

कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते, या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. डॉक्टर गौरी यांना पतीची एका तरुणीसोबतची चॅटिंग सापडली होती. त्याचे स्क्रीनशॉट गौरी यांनी वडिलांना पाठवले होते. ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं समजत आहे.
advertisement

मोबाईल चॅट अन् कॉल रेकॉर्डची तपासणी

दरम्यान, मुंबईतील वरळी भागातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेहाची पोस्टमॉर्टेमसाठी पाठवणी करण्यात आली आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. वरळी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : स्वत:ला संपवण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने वडिलांना Whats App वर कसले पुरावे पाठवले? पंकजा मुंडेंच्या PA च्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
Next Article
advertisement
Ajit Pawar ZP Elections Date :  ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव्य
'मला सांगितलंय की..', जिल्हा परिषद निवडणुकांबाबत अजितदादांच मोठं वक्तव्य
  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

View All
advertisement