Panvel : घरात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; लग्नाच्या काही वर्षांतच उघडकीस आले धक्कादायक कारण
Last Updated:
Panvel Shocking News : पनवेलमध्ये सासरी छळामुळे एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुल न झाल्याच्या कारणावरून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असून पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनवेल : पत्नीने आत्महत्या केल्याच्या प्रकरणात पतीविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना करंजाडे परिसरात घडली असून कौटुंबिक छळामुळे एका विवाहितेचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सुखी संसाराचे स्वप्न अधुरेच
तुषार महादेव पाटील हे दहिवली, सोमाटणे येथे वास्तव्यास असून त्यांची मुलगी मोनाली पाटील हिचे लग्न सूरज प्रकाश नाईक याच्याशी झाले होते. सूरज नाईक हा करंजाडे येथील रहिवासी आहे. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते. मात्र नंतर मोनालीला सासरी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
advertisement
मोनालीला मूल न झाल्याच्या कारणावरून तिला वारंवार टोमणे मारले जात होते. तसेच या कारणावरून तिचा अपमान केला जात असल्याचा आरोप आहे. घरातील या सततच्या तणावामुळे मोनाली मानसिकदृष्ट्या खचली होती. तिला अनेक वेळा शारीरिक मारहाणही करण्यात आली असल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
अखेर घेतला टोकाचा निर्णय
view commentsया सततच्या छळाला कंटाळून अखेर मोनालीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोनालीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती सूरज नाईक याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 8:32 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel : घरात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल; लग्नाच्या काही वर्षांतच उघडकीस आले धक्कादायक कारण









