advertisement

मुंबईकर पावसाळ्यात 18 दिवस धोक्याचे, 2 महिने आधीच आली यादी, लगेच नोट करा तारखा!

Last Updated:

Mumbai Monsoon: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून पावसाळ्यातील अलर्ट 2 महिने आधीच आला आहे. 18 दिवस समुद्र किनारी जाणं टाळावं लागणार आहे.

मुंबईकर पावसाळ्यात 18 दिवस धोक्याचे, 2 महिने आधीच आली यादी, लगेच पाहा तारखा!
मुंबईकर पावसाळ्यात 18 दिवस धोक्याचे, 2 महिने आधीच आली यादी, लगेच पाहा तारखा!
मुंबई: पावसाळा सुरू होण्यास जवळपास 2 महिन्यांचा अवधी आहे. तोपर्यंतच महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला मोठे उधाण येणार आहे, असा इशारा मुंबई महापालिकेच्या अपत्कालीन विभागाने दिला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान समुद्रात साडेचार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घ्यावी लागेल, असं आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय.
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला उधाण
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असते. याबाबत पालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येते. यंदाही 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. उधाणाच्या काळात समुद्रात साडेचार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा निर्माण होतात. तसेच भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास आणखी एक संकट निर्माण होतं. शहरातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेकडून पूर्वीच उधाणाचे दिवस जाहीर केले जातात.
advertisement
उधाणाचे दिवस
यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यांत 18 दिवस उधाणाचे असणार आहेत. जून महिन्यात 24, 25, 26, 27 आणि 28 जून हे 5 दिवस उधाणाचे असणार आहेत. या 5 दिवसांत सकाळी 11.15 ते दुपारी 2.26 या दरम्यान समुद्राला उधाण येणार असून साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात 24, 25, 26 आणि 27 या दिवशी समुद्राला उधाण येईल. ऑगस्ट महिन्यात 10, 11, 12, 23 आणि 24 या 5 दिवशी उधाण येण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्यात 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान 4 दिवस समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे.
advertisement
चौपाटीवर जाणं टाळा
समुद्राला उधाण आल्यानंतर अनेक पर्यटक या दिवशी आवर्जून उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी चौपाटीवर जातात. परंतु, अशा दिवशी चौपाटीवर जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना मज्जाव करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या दिवशी समुद्राला उधाण येणार आहे, त्या दिवशी पालिकेसह पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त समुद्र किनारी ठेवण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर पावसाळ्यात 18 दिवस धोक्याचे, 2 महिने आधीच आली यादी, लगेच नोट करा तारखा!
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement