Mumbai Book Fair: पुस्तकाच्या बदल्यात पुस्तक, मुंबईत खजिना खुला, शेवटची तारीख माहितीये का?

Last Updated:

Mumbai Book Exhibition: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वाचकांना स्वतःकडची पुस्तके देऊन त्याबदल्यात तेवढीच दुसरी पुस्तके घेण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे.

+
मुंबईत

मुंबईत खजिना खुला! पुस्तकाच्या बदल्यात पुस्तक, ठिकाण माहितीये का?

साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई: मुंबईकर वाचकांना स्वतःकडची वाचलेली आणि सुस्थितीत असलेली पुस्तके देऊन त्याबदल्यात तेवढीच दुसरी पुस्तके घेण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील शिवाजी पार्क मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक आदानप्रदान उपक्रमाचा प्रारंभ झाला आहे. 2 मार्चपर्यंत 9 ते रात्री 9 यावेळेत सर्वांसाठी हे आदान प्रदान खुले असेल. यांच वैशिष्ट्य म्हणजे इथे हजारो पुस्तकांचं प्रदर्शन लावण्यात आल आहे. मुंबईकर वाचकप्रेमी मित्रांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
advertisement
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वाचकांना स्वतःकडची पुस्तके देऊन त्याबदल्यात तेवढीच दुसरी पुस्तके घेण्याची विशेष संधी उपलब्ध झाली आहे. तुमच्याकडे पुस्तक बदलायचे असेल तर ते आणि प्रत्येकी 10 रुपये इथं द्यायचे. त्यानंतर इथं मांडलेल्या हजारो पुस्तकातून कोणतेही एक पुस्तक घेता येईल. फक्त द्यावयाची पुस्तके अगदी जीर्ण आणि फाटलेली नसावीत. पुस्तकांची स्थिती दुसऱ्यांना वाचण्यासारखी दर्जेदार असावी, अशी अट असणार आहे.
advertisement
25 प्रकाशन संस्थांची पुस्तकं
या पुस्तक महोत्सवात अनेक पुस्तक प्रकाशन संस्थांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. तुम्हाला इथेही अनेक विषयांची पुस्तक मिळतील. 25 हून अधिक प्रकाशन संस्थांची पुस्तकं इथं मांडण्यात आली आहेत. मराठी भाषा प्रेमींसाठी मराठी पुस्तकांचा खजिनाच इथे उपलब्ध करण्यात आला आहे.
advertisement
येवला पैठणी बनते कशी?
विशेष म्हणजे येवला आणि नाशिक जे पैठणी साड्यांचे माहेरघर म्हटले जाते तिथल्या पैठणी साड्या हात मागावर कशा शिवल्या जातात याचे प्रत्यक्ष उदाहरण सुद्धा या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊन पैठणी हात मागावर कसे शिवतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकता.
दरम्यान, तुम्ही सुद्धा वाचक प्रेमी आहात तर तुमच्यासाठी ही एक अमूल्य संधी आहे. इथून कविता, कथा, कादंबऱ्या तुम्हाला हवी तितकी पुस्तके आदान प्रदान करून घेऊन जाता येतील.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Book Fair: पुस्तकाच्या बदल्यात पुस्तक, मुंबईत खजिना खुला, शेवटची तारीख माहितीये का?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement