Marathi Book: तुमचं आयुष्य बदलू शकतात मराठीतील ही 7 पुस्तकं! तुम्ही वाचली का?

Last Updated:
Marathi Book: मराठी भाषेत अत्यंत दर्जेदार साहित्य आहे. मराठी भाषा गौरव दिनी आपलं आयुष्य बदलून टाकणारी ही 7 पुस्तकं वाचलीच पाहिजेत.
1/9
मराठी भाषा गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. मराठी भाषेत देखील उत्तम साहित्य आहे. अनेक चांगले ग्रंथ, पुस्तके आणि कविता संग्रह आहेत. जे आपण आवर्जून वाचले पाहिजेत. ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी मराठीतील वाचलीच पाहिजेत अशा 7 पुस्तकांची यादी दिलीये. याबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/9
भारतीय संस्कृती – साने गुरुजी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आपण अनेकदा ऐकतो की, ‘हे भारतीय संस्कृतीस शोभत नाही.’ अशा वेळेस भारतीय संस्कृतीचा इतिहास अभिप्रेत नसतो. भारतीय संस्कृतीची जी एक विशेष दृष्टी आहे, ती तेथे अभिप्रेत असते. भारतीय संस्कृतीची हीच विशाल व सर्वसमावेशक दृष्टी दाखविण्याचा प्रयत्न साने गुरुजी यांनी या पुस्तकात केला आहे.

3/9
आगरकर वाङमय: स. गं. नातू आणि दि. य. देशपांडे यांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. याचे दोन खंड देखील प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकामध्ये आगरकरांविषयी, त्यांच्या कामाविषयी संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. अतिशय उत्तम असे पुस्तक असल्याचं डोळे सांगतात.

4/9
बलुतं: अभिजनांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ज्येष्ठ लेखक दया पवार यांचं हे आत्मकथन आहे. ते भारतीय समाजाच्या भीषण, भेदक वास्तवाचं प्रखर दर्शन घडवतं. दगडू मारुती पवार या नायकाच्या दुःख, यातनांच हे 'बलुतं' समाजव्यवस्थेनंच बांधलेलं आहे. दया पवार हे ज्येष्ठ साहित्यिक, कवी आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत.

5/9
कृष्णाकाठ: महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेले यशवंतराव चव्हाण हे अग्रणी राष्ट्रीय नेते होते. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र लिहिले. त्याची पहिली आवृत्ती 7 फेब्रुवारी 1984 रोजी प्रेस्टिज प्रकाशनाने प्रसिद्ध केली होती. चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभाच्या निमित्ताने याच आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती रोहन प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे.

6/9
राडा: भाऊ पाध्ये यांनी लिहिलेली ‘राडा’ ही आपल्या राजधानीतल्या महानगरीय औद्योगिक जगात नैसगिकता हरवून बसलेल्या तरुण माणसाची लघुकादंबरी आहे. आथिर्क विकास लादल्या गेलेल्या भोगवादी वर्गातल्या वरवरून भरभराट होणाऱ्या कुटुंबातली नाती कशी आपोआपच ठिसूळ होत जातात, याचं हे कथानक आहे. लैंगिकतेचे महानगरीय दबाव कशा अनैसगिर्क वर्तनातून प्रकट होतात, हे त्यांनी न कचरता अस्सल लैंगिक भाषेतूनच मांडलं.

7/9
जिहाद: हुसेन जमादार यांनी हे पुस्तक लिहिलंय. ‘जिहाद’ म्हणजे केवळ धर्मयुद्ध नव्हे. एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे 'जिहाद' होय. हुसेन जमादार यांनी मुस्लिम समाजसुधारणा हेच आपल्या जीवनाचे महान उद्दिष्ट मानले आणि स्वत:ला तन, मन, धनाने या कार्यासाठी वाहून घेतले.

8/9
आता साऱ्या वह्या बुडीत खाती: अनुराधा पाटील यांच्या आता वह्या सगळ्या बुडीत खाती या कविता संग्रहाच्या शीर्षकावरून तुकोबांचा संदर्भ जागा होतो. तुकोबांनी सावकारी कर्जदारांच्या हिशोबाच्या वह्या आपणहून नदीत बुडवून अपराधीपणाच्या भावनेतून सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला. तर तुकोबांच्या कवितेच्या वह्या प्रस्थापित धर्ममार्तंडांनी नदीत बुडवून त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही अनुभव कवीसाठी वेदनेचे होते.

9/9
यासोबतच मराठी भाषेत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्मिती झालेली आहे. अगदी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखकांची पुस्तके देखील वाचनीय अशीच आहेत. तसेच ग्रामीण साहित्यिक, कथा, कादंबऱ्या, कविता संग्रह, प्रवास वर्णनं आदी विपुल साहित्य मराठीत आहे. ते देखील मराठी भाषिकांनी आवर्जून वाचावं. ( अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement