RBI Recruitment 2025 : रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 120 पदांसाठी होणार भरती; पगार किती?

Last Updated:

RBI Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरूणांचं फायनान्स संबंधित कार्यालयांमध्ये काम करण्याचे स्वप्न असते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणता आहे.

आरबीआय
आरबीआय
अनेक तरूणांचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank Of India) नोकरी करण्याचं स्वप्न आहे. त्याच तरूणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ग्रेड बी ऑफिसर पदांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या तरूणांचं फायनान्स संबंधित कार्यालयांमध्ये काम करण्याचे स्वप्न असते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी म्हणता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये कोण कोणत्या पदांसाठी नोकर भरती आहे? कोण कोणत्या विभागामध्ये नोकर भरती आहे? शैक्षणिक पात्रता किती? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी ऑफिसर पदासाठी 120 जागांची पदभरती आहे. 10 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 30 सप्टेंबर पर्यंत पात्र उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. ग्रेड बी ऑफिसर जनरल कॅटेगरी 83 जागा, ऑफिस ग्रेड बी डीईपीएआर मध्ये 17 आणि डीएसआयएम 20 अशा एकूण 120 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्ज प्रक्रियेला सुरूवात 10 सप्टेंबरपासून सायंकाळी 6 वाजेपासून सुरूवात झाली आहे. तर, अर्ज करण्याची आणि परीक्षा फी भरण्याचा शेवटचा दिवस 30 सप्टेंबर पर्यंत आहे. पात्र उमेदवार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता आणि अर्जाचे शुल्क सुद्धा भरू शकता.
advertisement
नोकर भरतीसाठी उमेदवारांना opportunities.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. वेगवेगळ्या विभागांमध्ये ही नोकर भरती केली जाणार आहे. यामध्ये ग्रेड बी ऑफिसर जनरल कॅटेगरी, DISM, DEPR अशा विभागात ही भरती केली जाणार आहे. चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी तुमच्याकडे आहे. ऑफिस ग्रेड बी जनरल पदासाठी उमेदवाराने किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन कोणत्याही विषयातून पदवी मिळवलेली असावी. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांनी पदवी किमान 55 टक्यांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. ऑफिसर ग्रेड बी डीईपीआरसाठी इकोनॉमिक्स किंवा फायनान्स विषयात पदव्युत्तर पदवी झालेली असावी किंवा पीजीडीएम आणि एमबीए केलेलं असावं. तर, ऑफिसर ग्रेड बी डीएसआयएम पदासाठी संख्याशास्त्र किंवा गणित या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असावं.
advertisement
रिझर्व्ह बँकेतील ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त 30 वर्षांदरम्यान असावं. जे उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छितात त्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. त्यासोबतच परीक्षा शुल्क देखील भरावा लागेल. खुला प्रवर्ग, इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये शुल्क भरावं लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क 100 रुपये शुल्क म्हणून भरावे लागेल. परीक्षा शुल्कासोबत जीएसटी सुद्धा भरावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर अर्जदाराला फॉर्मची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. आवश्यक त्या कागदपत्रांसाठी उमेदवारांना जाहिरात पाहावी लागणार आहे. नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परिक्षेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
advertisement
आरबीआयच्या भरती संदर्भातील नोटिफिकेशननुसार परीक्षा १८- १९ ऑक्टोबर या कालावधी फेज १ परीक्षा होणार आहे. त्यानंतर ६-७ डिसेंबर रोजी फेज २ परीक्षा होणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी परीक्षेची तयारी करावी. अर्जदारांना परीक्षेपूर्वी काही दिवस अगोदर प्रवेशपत्र मिळेल. निवड होणाऱ्या उमेदवारांना 78450 मूळ वेतन दरमहा या प्रमाणं 78540-400(9)-114900-EB-4050(2)-123000-4650(4)-141600 या ग्रेड पे नुसार वेतन मिळेल. इतर सर्व भत्यांसह साधारणपणे दीड लाख पगार मिळेल. बँकेनं निवासस्थान उपलब्ध करुन न दिल्यास दरमहा घरभाडे भत्ता दिला जाईल.ं
मराठी बातम्या/मुंबई/
RBI Recruitment 2025 : रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 120 पदांसाठी होणार भरती; पगार किती?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement