मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; वडिलांविरोधात मुलाला उतरवणार?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गट देखील ॲक्शनमध्ये दिसत आहे.
मुंबई, 30 सप्टेंबर : सर्वच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गट देखील ॲक्शनमध्ये असून, उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीला मातोश्रीवर सुरूवात झाली असून, पक्षातील सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
सध्या या मतदारसंघामध्ये गजानन किर्तीकर हे खासदार आहेत. मात्र गजनान किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची असा मोठा प्रश्न ठाकरे गटासमोर आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या जागेवर आता ठाकरे गट गजानन किर्तीकर यांचा मुलगा अमोल किर्तीकर यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीमध्ये आहे. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्यास या मतदारसंघात वडिलांविरोधात मुलगा असा सामना रंगू शकतो.
advertisement
विभागप्रमुखांचीही होणार बैठक
गणेशोत्सवापूर्वी मुंबई वगळता राज्यातील इतर लोकसभा मतदारसंघाचा आढावा ठाकरे गटाकडून घेण्यात आला होता. आता मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. या बैठकीनंतर मुंबईतल्या सर्व विभागप्रमुखांचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याची तयारी आणि होवू दे चर्चा कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत ही बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2023 3:12 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेसाठी ठाकरे गटाचा मास्टर प्लॅन; वडिलांविरोधात मुलाला उतरवणार?