NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता पुढे काय?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता पुढे काय?
नवी दिल्ली: शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला आता वेगवेगळ्या स्वरूपात मिळणारी देणगी स्विकारता येणार आहे. याबाबतची मागणी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. राष्ट्रवादी पक्ष आणि नावाचा वाद कोर्टात गेल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर काही निर्बंध आले होते.
नेमकं प्रकरण काय? अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. एक एनसीपी शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट. त्यानंतर राष्ट्रवादी नाव आणि चिन्हं कुणाचं हा वाद सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्हं अजित पवारांना बहाल केलं. परिणामी राष्ट्रवादी पक्षच अजित पवारांकडे गेला. त्यानंतर शरद पवार यांच्या गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हं मिळालं. परंतु, पक्षाचा दर्जा राहिला नव्हता. त्यामुळे कार्यकर्ते, विविध संस्था आणि उद्योजक यांच्याकडून मिळणारे फंडींग पक्षाला स्विकारता येत नव्हते.
advertisement
आता देणगी स्विकारता येणार: त्यानंतर नुकत्याचं पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला चांगले मतदान झाले. दुसरीकडे पक्षानेही निवडणूक आयोगाकडे पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली. सर्व बाबी विचारात घेत आता आयोगाने पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला आता अधिकृतपणे निधी स्विकारता येणार आहे.
याबाबत आज सकाळी सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादीच्या आठ इतर नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आयोगाने प्रक्रियेनुसार सेक्शन 29 बी नुसार आणि 29 सी नुसार प्रतिनिधी कायदा 1951 चा हवाला देत पक्षाला देणगी निधी स्विकारण्यास परवानगी दिली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 08, 2024 7:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
NCP Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, आता पुढे काय?


