मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, तरुणाने डोक्यात घातला लोखंडी रॉड, फिरायला गेले अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून ठाकरे गटाच्या एका निष्ठावान पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून ठाकरे गटाच्या एका निष्ठावान पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. आरोपीनं लोखंडी सळई डोक्यात घालून शिवसैनिकाचा खून केला आहे. घाटकोपरमधील सीजीएस कॉलनी परिसरात गुरुवारी हा प्रकार घडला, ज्यामुळे विक्रोळी पार्कसाईट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सुरेंद्र धोंडुराम पाचाडकर (रा. विक्रोळी पार्कसाईट) असे हत्या झालेल्या शिवसैनिकाचं नाव आहे. ते विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते.
गुरुवारी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाचाडकर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यासाठी आले होते. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या सीजीएस कॉलनीमधून चालत जात असताना त्यांना अमन श्रीराम वर्मा (वय १९) या तरुणाचा धक्का लागला. धक्का लागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
यावेळी संतापलेल्या आरोपी अमन वर्मा याने जवळच पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्यात घातला. या वर्मी घावाने सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेतील पाचाडकर यांना उपचारासाठी जवळील खासगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
सुरेंद्र पाचाडकर हे पार्कसाईट परिसरात एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे. ते शिवजयंतीच्या कार्यक्रमात नेहमी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्ररथावर उभे राहात असत. याच कारणामुळे त्यांना त्यांचे सहकारी 'महाराज' या टोपणनावाने ओळखायचे. त्यांची अशाप्रकारे हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पाच तासांत आरोपी जेरबंद
हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी सुमारे ८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि आरोपी अमन वर्मा याचा माग काढला. आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांन अवघ्या पाच तासांमध्ये आरोपी अमन वर्मा याला रमाबाई कॉलनीतून अटक केली. चालताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 22, 2025 9:27 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, तरुणाने डोक्यात घातला लोखंडी रॉड, फिरायला गेले अन्...










