Mumbai Local : खचाखच गर्दी अन् महिलांच्या डब्यात घुसला 'तो', अचानक महिलेवर हल्ला, लोकलमध्ये गोंधळ
Last Updated:
Mumbai Local Shocking News : पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये मनोरुग्ण तरुणाने महिलांवर हल्ला केला शिवाय एका महिलेच्या हाताला चावा घेतला. जुईनगर स्थानकावर पोलिसांनी त्याला उतरवले पण तो पसार झाला.
नवी मुंबई : मुंबई लोकल ही वारंवार कोणत्याना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेचा विषय ठरत असते. त्यात पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्ये असं काही घडलं आहे की ज्याने सर्वजण हादरुन गेलेले आहेत. नेमकं घडलं काय आणि पुढे काय झालं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
advertisement
मुंबई लोकलमध्ये घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना शुक्रवारी रोजी गर्दीच्या वेळी घडली आहे. जिथं शुक्रवार सकाळी मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात एका मनोरुग्ण तरुणाने धुडगूस घालून महिलांवर अचानक हल्ला केला. महिलांनी त्याला हकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांना न जुमानता एका महिलेच्या हाताचा चावा घेतला. घडलेल्या या प्रकारने महिला डब्यात गोंधळ उडाला होता.
advertisement
नेमका हा प्रवाशी कुठे चढला?
लोकल कुर्ला स्थानकादरम्यान आली असता हा मनोरुग्ण महिला डब्यात चढला आणि थेट डब्यातील बाकड्यावर बसलेल्या महिलांना खाली उतरण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यानंतर त्या व्यक्तीनेच महिलांवर हल्ला केला. गोंधळ पाहून एका महिला प्रवाशाने तात्काळ रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली.
advertisement
जुईनगर स्थानकावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी तातडीने रेल्वे पोलीस पथकाला सतर्क केले. पोलिसांनी त्याला तिथे उतरवले, मात्र तो पसार झाला. या मनोरुग्णाचा शोध अद्याप सुरू आहे. प्रवाशांसाठी आणि विशेषतहा महिलांसाठी ही घटना धक्कादायक असून लोकलमध्ये सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : खचाखच गर्दी अन् महिलांच्या डब्यात घुसला 'तो', अचानक महिलेवर हल्ला, लोकलमध्ये गोंधळ











