Shockig Accident Virar: मध्य खाडीत बोटीला मोठं भगदाड; हळूहळू शिरू लागलं पाणी, प्रवाशांच्या डोळ्यासमोरच घडली थरारक घटना

Last Updated:

Virar Boat Accident : नायगावहून पाणजू गावाकडे जाणाऱ्या फेरीबोटीला खाडीच्या मध्यभागी दगड लागून मोठं भगदाड पडलं. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 90 प्रवासी सुखरूप बचावले.

News18
News18
मुंबई : नायगाव जेट्टीवरून पाणजू गावाकडे निघालेल्या एका फेरीबोटीला खाडीच्या मध्यभागी दगड लागल्यामुळे मोठे भगदाड पडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बोटीतील सुमारे 90 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, बोटीच्या चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या सर्व प्रवाशांचे प्राण वाचले. कोणतीही जीवितहानी न झाल्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नेमके काय घडले?
बुधवारी बाजारासाठी निघालेल्या आणि गावात उत्तरकार्यासाठी जात असलेल्या पाहुण्यांना घेऊन ही बोट निघाली होती. बोट खाडीच्या मध्यावर पोहोचली असताना अचानक त्यामध्ये पाणी भरू लागले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. बोटीच्या चालकाने तात्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बोटीचा वेग वाढवला आणि तिला लवकरात लवकर किनाऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, बोटीचे इंजिन बंद पडेपर्यंत ती किनाऱ्याजवळील चिखलात रुतली. यानंतर, तातडीने सर्व 90 प्रवाशांना सुरक्षितपणे बोटीतून बाहेर काढण्यात आले.
advertisement
बोटीचे मोठे नुकसान
प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर तपासणी केली असता, बोटीला सुमारे सहा इंचाचं मोठं भोक पडल्याचं दिसून आलं,या घटनेमुळे पाणजू बेटावरील जलवाहतुकीच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ग्रामस्थांची तीव्र मागणी
पाणजू बेटावर अद्ययावत जेट्टी बांधून तयार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तीव्र मागणी केली आहे की, प्राधान्याने एक नवीन, मोठी, आणि सुरक्षित बोट उपलब्ध करून देण्यात यावी. या नवीन बोटीमध्ये किमान तीनचाकी सामानाचा टेम्पो, दुचाकी, रिक्षा यांसारखी वाहने घेऊन जाण्याची व्यवस्था असावी, अशी त्यांची मागणी आहे. या सुविधेसाठी किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल, असा प्रश्नही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shockig Accident Virar: मध्य खाडीत बोटीला मोठं भगदाड; हळूहळू शिरू लागलं पाणी, प्रवाशांच्या डोळ्यासमोरच घडली थरारक घटना
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement