Mumbai Crime : एकतर्फी प्रेमाचा सायको थरार! होकार मिळेना म्हणून तरुणीसोबत सुरु केला भयान प्रकार; मुंबईतील घटना
Last Updated:
Mumbai Crime News : मुंबई शहरातून वारंवार अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत असतात. पण सध्या समोर आलेल्या प्रकराने सर्वजण हादरुन गेले आहे. सध्या या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
मुंबई : एकतर्फी प्रेमाचे रुप अनेकदा किती भयानक असते हे वारंवार घडतं असलेल्या घटनेमुळे सर्वांसमोर येत असते. अशातच मुंबई शहरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
सायको लव्हरचा थरकाप उडवणारा प्रताप
एकतर्फी प्रेमातून तरुणीचा सातत्याने पाठलाग करत मानसिक त्रास दिल्याप्रकरणी तिच्या परिचित असलेल्या धिरेश नावाच्या तरुणाविरोधात आरएके मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने यापूर्वीही आरोपीविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्यानंतरही आरोपीचे कृत्य सुरूच राहिल्याचे तपासात समोर आले आहे.
दोघांची ओळख कशी झाली?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी 27 वर्षांची असून ती नायगाव परिसरात वास्तव्यास आहे. यापूर्वी तक्रारदार आणि आरोपी दोघेही नायगाव येथील लेबर कॅम्प परिसरात राहत होते. त्या काळातच आरोपी धिरेश तिच्या संपर्कात आला होता. परिचयातूनच आरोपीने तिच्याविषयी एकतर्फी प्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.
advertisement
लग्नाला हो म्हण, नाहीतर...
आरोपीकडून वारंवार लग्नाची मागणी केली जात होती. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतरही तो तिचा पाठलाग करत होता. सतत फोन कॉल करून लग्नाविषयी विचारणा करणे, मानसिक दबाव टाकणे असे प्रकार सुरूच होते. या त्रासाला कंटाळून तरुणीने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर तरुणीने आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. तरीदेखील आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरूच ठेवल्याने अखेर आरएके मार्ग पोलिस ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 2:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : एकतर्फी प्रेमाचा सायको थरार! होकार मिळेना म्हणून तरुणीसोबत सुरु केला भयान प्रकार; मुंबईतील घटना









