सिद्धिविनायकाच्या प्रसादात उंदीर? व्हायरल व्हिडीओवर ट्रस्टच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही...

Last Updated:

तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादावरून वाद निर्माण झाला असताना सिद्धिविनायक मंदिरातील लाडू प्रसादाचा व्हिडीओ असल्याचा दावा करणाऱ्या या व्हिडीओने खळबळ उडाली.

News18
News18
प्रणाली कापसे, प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या लाडू प्रसादात उंदीर सापडल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाडू ठेवलेल्या ट्रेमध्ये उंदराची पिल्ली या व्हिडीओत दिसत आहेत. याशिवाय काही फोटोही व्हायरल होत असून त्यात ट्रे आणि लाडू उंदरांनी कुरतडले असल्याचंही दिसतंय. तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादावरून वाद निर्माण झाला असताना सिद्धिविनायक मंदिरातील लाडू प्रसादाचा व्हिडीओ असल्याचा दावा करणाऱ्या या व्हिडीओने खळबळ उडाली. पण हे व्हिडीओ सिद्धिविनायक मंदिरातील नसल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं.
advertisement
सदा सरवणकर यांनी म्हटलं की, गेले दोन दिवस एक क्लीपद्वारे प्रसादात काहीतरी आहे म्हणून दाखवले जात आहे. ⁠प्रसाद हा शुद्ध असावा यासाठी प्रशासन काम करत असते. प्रत्येक वस्तू ही बीएमसी लॅबमध्ये टेस्टकरून देतो. ⁠आमचा प्रसाद हा शुद्ध आहे. आम्ही चौकशी करू, आजपासून हा तपास सुरू होत आहे. आधी आम्ही अंतर्गत तपास करू आणि नंतर पोलिसांना त्यात अंतर्भूत करू असंही सरवणकर यांनी सांगितलं.
advertisement
व्हायरल व्हिडीओबाबत सदा सरवणकर म्हणाले की, ⁠क्लीपनध्ये काहीतरी दिसत आहे. आमचा प्रसाद हा अतिशय शुद्ध ठिकाणी आणि स्वच्छ ठिकाणी बनवले जातात. व्हायरल होत असलेले हे फोटो खोटे आहेत. ⁠ही क्लीप इथली नाही. ती कुठली आहे? किती वाजताची आहे? काहीच कळत नाही. त्यामुळे ती आमची नाही असेच आमचे म्हणणे आहे.
advertisement
मुंबईत दहा दहा मजल्यापर्यंत उंदीर जातात हे आपल्याला माहिती आहेत. त्यासाठी आमच्याकडे पिंजरे आहेत. हा व्हिडीओ आमच्या इथला नाही. आमच्याकडे अशी घाण नाही. अतिशय स्वच्छता आहे. त्यामुळे हा आमचा नाही असे आम्ही खात्रीलायक सांगतो. यामागे कोणी तरी काम करतेय. ते कोण हे आता सांगणे कठिण आहे. कोणी हिंदू देवी देवतांची ठिकाणे बदनाम करून काय मिळते हे सांगणे कठिण आहे असं म्हणत सरवणकर यांनी हा सर्व प्रकार हिंदू देवी देवतांची बदनामी करण्याचा डाव असल्याचा आरोपही केला.
मराठी बातम्या/मुंबई/
सिद्धिविनायकाच्या प्रसादात उंदीर? व्हायरल व्हिडीओवर ट्रस्टच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आम्ही...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement