Mumbai : दादरकरांसाठी आनंदाची बातमी! पूर्व-पश्चिम जोडणारा पूल कधी होणार?तारीख आली समोर
Last Updated:
New Tilak Bridge Dadar Update : दादरमधील नवा टिळक पूल यावर्षी सुरू होणार आहे. सध्या काम 70 टक्के पूर्ण झालं असून हा सहा पदरी पूल मुंबईच्या पूर्व-पश्चिम वाहतुकीस मोठा दिलासा देणार आहे.
मुंबई : दादरमधील रहिवांशासाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. दादर येथील नवा टिळक पूल यावर्षी प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या पुलाचं काम सुमारे 70 टक्के पूर्ण झालं आहे. हा पूल दादरमधील रेल्वे रुळांवरून पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.
जुना ब्रिटिशकालीन पूल पाडून उभारला जातोय नवा ब्रिज
दादरमधील जुना टिळक पूल 1925 साली ब्रिटिशांनी बांधला होता. अनेक वर्षे वापरात असल्यामुळे हा पूल जीर्ण झाला होता. 2019 मध्ये मुंबई महापालिकेने हा पूल सुरक्षित नसल्याचं जाहीर केलं. गणेशोत्सवाच्या काळात या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नवीन पूल उभारण्याची गरज निर्माण झाली.
advertisement
दादरचा महत्त्वाचा पूल लवकरच सुरू
यामुळे महापालिकेने जुन्या पुलाच्या समांतर नवा केबल-स्टेड पूल बांधण्याचा निर्णय घेतला. नवीन पूल जुन्या पुलाच्या बाजूला बांधला जात असल्याने सध्या वाहतुकीवर फारसा परिणाम होत नाही. नवीन पूल सुरू होईपर्यंत जुना पूल वापरात राहणार आहे. नवा टिळक पूल दोन टप्प्यांत उभारला जात आहे. पहिला टप्पा एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात तीन पदरी पूल बांधण्यात येत असून तो पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी उपयोगी ठरणार आहे. पहिल्या टप्प्यानंतर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात येईल आणि दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू होईल.
advertisement
दुसरा टप्पाही तीन पदरी असेल. एकूण सहा पदरी नवा टिळक पूल 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे. या पुलाची लांबी 600 मीटर असून रुंदी 16.7 मीटर आहे. या प्रकल्पासाठी 375 कोटी रुपयांचा खर्च येणार असून मुंबई महापालिका आणि एमआरआयडीसी संयुक्तपणे हा पूल उभारत आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 11:58 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : दादरकरांसाठी आनंदाची बातमी! पूर्व-पश्चिम जोडणारा पूल कधी होणार?तारीख आली समोर









