Success Story: 30 दिवसांत 50 हजार कमाई; दादरच्या तरुणीने चॅलेंज पूर्ण करून दाखवलं
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
स्वप्नांना नवा आकार देणारी एक तरुणी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. केईएम रुग्णालयात पॅरामेडिकल शिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी दररोज संध्याकाळी स्वतःच्या हाताने बनवलेले चीजकेक विकण्यासाठी स्टॉल लावते.
मुंबई: मुंबई म्हटलं की गजबजलेलं आयुष्य, व्यस्त दिनक्रम आणि स्वप्नांच्या मागे धावणारे तरुण मनं हे चित्र समोर येतं. अशाच स्वप्नांना नवा आकार देणारी केतकी खातू ही 22 वर्षाची तरुणी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. केईएम रुग्णालयात पॅरामेडिकल शिक्षण घेणारी केतकी खातू दररोज संध्याकाळी स्वतःच्या हाताने बनवलेले चीजकेक विकण्यासाठी स्टॉल लावते. या स्टॉलचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिची मेहनत, नव्या पिढीचा उत्साह आणि सोशल मीडियावर घेतलेलं “30 दिवसांत 50 हजार रुपये कमवायचं चॅलेंज” — जे तिने यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे.
चीजकेकचा प्रवास ‘मिमी’पासून सुरू झाला
चीजकेकच्या व्यवसायाची सुरुवात एका गोंडस कारणाने झाली. तिच्याकडे ‘मिमी’ नावाचा एक छोटासा कुत्रा आहे, ज्याला केक आणि बिस्किटं खूप आवडतात. त्याच्यासाठी केक बनवताना तिला बेकिंगची आवड निर्माण झाली. त्यानंतर तिने वेगवेगळे फ्लेवर्स, रेसिपीज शिकल्या आणि मग ही कला व्यवसायात उतरवायचा निर्णय घेतला.
चॅलेंज आणि सोशल मीडिया प्रसिद्धी
4 ऑक्टोबर 2025 रोजी तिने या चीजकेक व्यवसायाची सुरुवात केली. सोशल मीडियावर दररोज आपल्या स्टॉलचे व्हिडिओ आणि ब्लॉग शेअर करत ती लोकांशी जोडली गेली. हळूहळू तिच्या चॅलेंजविषयी अनेकांना कुतूहल निर्माण झालं आणि अनेक जण तिच्या चीजकेकचा आस्वाद घेण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याजवळील स्टॉलवर पोहोचू लागले.
advertisement
कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा
या प्रवासात तिच्या सोबत तिची आई , मैत्रीण खुशी आणि भाऊ नेहमी उभे राहिले. आठवड्याच्या दिवसांत ती परेल व्हिलेज येथे स्टॉल लावते, तर शनिवार-रविवारी शिवाजी पार्क येथे तिचा चीजकेक स्टॉल अनेकांना आकर्षित करतो.
स्वप्नवत सुरुवात, प्रेरणादायी यश
view comments4 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या एका महिन्यात 50 हजार रुपये कमावून तिने सिद्ध केलं की इच्छाशक्ती, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर छोटा व्यवसायही मोठं स्वप्न साकार करू शकतो. शिक्षणासोबत स्वतःचा व्यवसाय उभा करत ही तरुणी आज अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 5:40 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Success Story: 30 दिवसांत 50 हजार कमाई; दादरच्या तरुणीने चॅलेंज पूर्ण करून दाखवलं

