'आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस'; HRचा कंपनीच्या CEOसह संपूर्ण ऑफिसला Termination मेल

Last Updated:

HR Termination Email: एका HR टीमच्या छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण कंपनीत खळबळ उडाली. टेस्टिंगदरम्यान चुकून पाठवलेल्या Termination Mail मुळे 300 कर्मचारी, अगदी CEOसह काही क्षणांसाठी बेरोजगार ठरले.

News18
News18
मुंबई: नोकरीवरून काढल्याचं मेल मिळणं ही कोणासाठीही भीतीदायक गोष्ट असते. पण जर संपूर्ण ऑफिसलाच अगदी कंपनीच्या CEO पर्यंत, “Termination मेलआला तर काय होईल? अशीच एक विचित्र घटना एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामुळे इंटरनेटवर प्रचंड चर्चा रंगली आहे.
advertisement
ही घटना Reddit या प्लॅटफॉर्मवरील r/Wellthatsucks या थ्रेडमध्ये शेअर करण्यात आली. त्या कर्मचाऱ्याने सांगितलं की कंपनीच्या Human Resources (HR) विभागाकडून चुकून एक “Termination Letterम्हणजेच नोकरीवरून काढल्याचं पत्र सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलं गेलं.
advertisement
खरं तर HR टीम एका ऑटोमेशन टूलचं टेस्टिंग करत होती. हे टूल कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपोआप “Exit Mail” पाठवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने कोणीतरी सिस्टमचं Test Mode वरून Live Mode मध्ये स्विच करणं विसरलं. आणि त्यामुळे काही सेकंदांतच त्या सॉफ्टवेअरने संपूर्ण कंपनीला एकच ईमेल पाठवला
advertisement
Your last working day is effective immediately.” म्हणजेच तुमचा शेवटचा कामाचा दिवस आजपासूनच लागू आहे!
कंपनी गोंधळ उडाला
त्या कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हा ईमेल मिळताच 300 कर्मचारी घाबरले. ज्यात लीडरशिप टीम आणि CEO सुद्धा होते. सकाळी ऑफिस उघडलं आणि सगळ्यांना एकच मेल दिसला- की तुम्ही आजपासून कामावरून काढले आहे, असे त्या मेलमध्ये लिहिले होते.
advertisement
थोड्याच वेळात Slack Channels वर गोंधळ उडाला माजली. कुणी विचारत होतं, खरंच का? तर एक मॅनेजर मजेत म्हणाला, “मग मी सामान बांधायला सुरुवात करू का? संपूर्ण कंपनीत वातावरण एवढं गोंधळलेलं झालं की अखेर IT विभागाला तात्काळ हस्तक्षेप करावा लागला.
advertisement
त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एक मोठ्या अक्षरात (ALL CAPS) मेल पाठवला- NO ONE IS FIRED. PLEASE DO NOT TURN IN YOUR BADGES. (कोणालाही नोकरीतून काढलेले नाही. कृपया तुमचे आयडी कार्ड परत करू नका.)
इंटरनेटवर हशा 
ही पोस्ट काही तासांतच 36,000 हून अधिक अपवोट्स मिळवत व्हायरल झाली. अनेकांनी ही घटना “हास्यास्पद पण अत्यंत रिलेटेबल” असल्याचं म्हटलं. काहींनी आपापले अनुभवही शेअर केले.
advertisement
एका यूजरने लिहिलं- जर तुम्ही अशा देशात राहत असाल जिथे कामगारांचे अधिकार चांगले आहेत, तर कधी कधी असं मेल मिळणं ही वरदान ठरू शकतं. मी एकदा कंपनी सोडायचं ठरवलं होतं आणि त्याच वेळी त्यांनी मला ‘रेडंडंट’ ठरवलं. त्यामुळे मला तीन महिन्यांचा पगार आणि लगेच सुट्टी मिळाली.
दुसऱ्या यूजरने थोड्या विनोदी अंदाजात लिहिलं- मी अशा काही कंपन्यांमध्ये काम केलं आहे जिथे मला वाटायचं, जर तुम्ही इतके मूर्ख आहात की मला नोकरीवरून काढाल, तर मीसुद्धा इथे काम करायला इच्छुक नाही. मी तर असा मेल मिळाला असता तर ‘थम्ब्स अप’ देऊन बॅग पॅक करायला सुरुवात केली असती.
आणखी एका यूजरने या तंत्रज्ञानावरच शंका घेतली. तो म्हणाला- ज्या कंपनीला अशा प्रकारचं ऑटो-फायरिंग टूल वापरायची गरज भासते, ती कंपनी लवकरच बंद पडणार हे नक्की.
view comments
मराठी बातम्या/मनी/
'आज तुमच्या कामाचा शेवटचा दिवस'; HRचा कंपनीच्या CEOसह संपूर्ण ऑफिसला Termination मेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement