TV Actress चे 2 मिसकॅरेज, शरीर काळं-निळं पडलं; मृत्यूच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीला आला स्वामींच्या भक्तीचा अनुभव

Last Updated:
अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी आलेले स्वामींच्या कृपेचे अनुभव सांगितले आहेत. असाच काहीसा अत्यंत भावूक आणि थरारक अनुभव मराठी अभिनेत्रीने सांगितला आहे.
1/8
मुंबई: श्री स्वामी समर्थांवर अनेक कलाकारांची निस्सीम भक्ती आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगी आलेले स्वामींच्या कृपेचे अनुभव सांगितले आहेत. असाच काहीसा अत्यंत भावूक आणि थरारक अनुभव मराठी अभिनेत्री स्वाती देवल यांनी नुकताच सांगितला आहे.

advertisement
2/8
स्वामींच्या कृपेमुळे त्या अक्षरशः मरणाच्या दारातून परत आल्याचे त्यांनी सांगितले आहे. स्वाती देवल यांनी त्यांच्या गरोदरपणातील अत्यंत वेदनादायी आणि कठीण अनुभवांबद्दल एका दिलेल्या मुलाखतीत मन मोकळे केले.

3/8
अभिनेत्री स्वाती देवल यांनी सांगितले की, मुलगा स्वराध्य होण्यापूर्वी त्यांचे दोनदा मिसकॅरेज झाले होते. यातील दुसरा अनुभव सर्वात वाईट होता.
अभिनेत्री स्वाती देवल यांनी सांगितले की, मुलगा स्वराध्य होण्यापूर्वी त्यांचे दोनदा मिसकॅरेज झाले होते. यातील दुसरा अनुभव सर्वात वाईट होता.
advertisement
4/8
स्वाती देवल म्हणाल्या,
स्वाती देवल म्हणाल्या, "एकदा तर माझ्या सातव्या महिन्यात मिसकॅरेज झाले होते आणि तो मुलगाच होता. त्यावेळी मी खूप कठीण परिस्थितीतून वर आलेली. मी स्वामींचा जप करत हॉस्पिटलमध्ये गेले आणि जप करतच बाहेर आले. तेव्हासुद्धा स्वामींनी वाचवलं!"
advertisement
5/8
तो काळ किती गंभीर होता, हे सांगताना त्या म्हणाल्या,
तो काळ किती गंभीर होता, हे सांगताना त्या म्हणाल्या, "मी त्यावेळी काळी-निळी पडले होते. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलेलं की, माहिती नाही हिचं काय होईल, तुम्ही सह्या द्या... त्याने थरथरत सह्या केल्या होत्या." तुषार आणि स्वाती दोघेही त्याक्षणी फक्त महाराजांचे स्मरण करत होते.
advertisement
6/8
आधीच्या वाईट अनुभवांमुळे स्वराध्यच्या वेळी स्वाती देवल प्रचंड तणावात होत्या.
आधीच्या वाईट अनुभवांमुळे स्वराध्यच्या वेळी स्वाती देवल प्रचंड तणावात होत्या. "सहाव्या महिन्यात बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत, हे ऐकेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेव्हा मी स्वामींचं चांदीचं कॉईन आणि दत्तगुरूंचं कॉईन हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते," असे त्यांनी सांगितले. बाळ चांगले आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यावरच त्यांना हायसे वाटले.
advertisement
7/8
स्वाती देवल यांचे गुरु वाडीचे दिगंबर पुजारी आहेत. एकदा त्यांनी स्वाती देवल यांना दादर येथील मठात अकरा शनिवार जायला सांगितले.
स्वाती देवल यांचे गुरु वाडीचे दिगंबर पुजारी आहेत. एकदा त्यांनी स्वाती देवल यांना दादर येथील मठात अकरा शनिवार जायला सांगितले. "काहीही मागू नकोस, काहीही बोलू नको, फक्त नमस्कार कर आणि तोरण ठेव... 'माझ्यावर लक्ष ठेवा' असंही म्हणू नकोस, कारण स्वामींचं लक्ष आहे," असा संदेश त्यांच्या गुरूंनी त्यांना दिला होता.
advertisement
8/8
शेवटचे दोन शनिवार बाकी असताना स्वाती देवलची तब्येत बिघडली. तेव्हा नवरा म्हणाला, 'घरात बस, महाराजांचं नामस्मरण कर.' त्यावेळी अचानक एक व्यक्ती दुपारी त्यांच्या घरी पादुका आणि पावती घेऊन आला, जी त्यांच्या नावाने पाठवलेली होती. यातून त्यांना स्वामी त्यांच्यासोबत असल्याचे साक्षात अनुभवले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement