थंडगार पाण्यासाठी आजही अनेकजण आधुनिक फ्रीजऐवजी मातीच्या माठाला प्राधान्य देतात. माठातील पाणी केवळ नैसर्गिकरित्या थंड नसते, तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. मात्र, माठ खरेदी करताना अनेक लोकांसमोर एक प्रश्न उभा राहतो: लाल मातीचा माठ चांगला की काळ्या मातीचा? काही ठिकाणी पांढरे माठही दिसतात. माठाच्या मातीचा प्रकार आणि रंग याचा पाण्यावर आणि त्याच्या थंड क्षमतेवरखरंच काही परिणाम होतो का?छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर दिले आहे. माठ निवडताना रंगापेक्षा अधिक महत्त्वाच्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि उत्तम मातीचा माठ कसा ओळखावा, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. माठाच्या या रंगाचे रहस्य आणि आरोग्यदायी पाण्याचे फायदे जाणून घ्या!
Last Updated: November 10, 2025, 17:39 IST