EVM: विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या EVM मशीनची झाली तपासणी, निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट

Last Updated:

10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली.

(election commission of india)
(election commission of india)
मुंबई : महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकालामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवारासह अनेक आमदार पराभूत झाले होते.  मात्र, ईव्हीएम मशीन आणि वाढलेल्या मतदानाच्या आकड्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. मात्र,  भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्रे योग्य स्थितीत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या आहे. व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही.
या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले आहे.
advertisement
काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर आणि मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलिबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले आहेत.
advertisement
निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असं भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
EVM: विधानसभा निवडणुकीत वापरलेल्या EVM मशीनची झाली तपासणी, निवडणूक आयोगाने दिली मोठी अपडेट
Next Article
advertisement
BMC Election:  'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईतल्या भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी
  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

  • 'तुमची अट अमान्य, शिंदेंना धक्का', मुंबईत भाजप-सेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी

View All
advertisement